शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२६३ स्ट्रीटलाईटने प्रकाशणार गडचिरोली

By admin | Updated: January 7, 2016 01:54 IST

नगरोत्थान योजनेंतर्गत गडचिरोली शहरासाठी प्राप्त झालेल्या ९३ लाख रूपयांच्या निधीतून १६७ ठिकाणी नवीन खांब उभारले जाणार आहेत.

गडचिरोली : नगरोत्थान योजनेंतर्गत गडचिरोली शहरासाठी प्राप्त झालेल्या ९३ लाख रूपयांच्या निधीतून १६७ ठिकाणी नवीन खांब उभारले जाणार आहेत. या नवीन खांबांवर तसेच जुन्या ९६ खांबावर वायरिंग टाकली जाणार आहे. जुन्या व नव्या अशा एकूण २६३ खांबांवर स्ट्रीटलाईट लावले जाणार आहेत. त्यामुळे काही वॉर्डांमध्ये असलेली अंधाराची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. मागील १० वर्षात गडचिरोली शहराचा दुप्पटीने विस्तार झाला. शहराच्या सभोवताल अनेक नवीन वस्त्या तयार झाल्या. या वस्त्यांमध्ये हजारो लोक राहत आहेत. मोठमोठ्या इमारती तयार झाल्या आहेत. मात्र या ठिकाणी वीज पुरवठा झाला नाही. परिणामी स्थानिक नागरिकांना ३०० ते ४०० मीटरवरून वीज पुरवठा आणावा लागत होता. एवढ्या दूरून वीज पुरवठा आणत असताना दुप्पट खर्चासह धोकाही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोली शहराला प्राप्त झालेल्या नगरोत्थान योजनेच्या निधीतून वाढलेल्या वस्त्यांना वीज पुरवठा करण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला. नेमक्या कोणत्या ठिकाणी पथदिवे व नवीन खांब टाकण्याची गरज आहे. याबाबतचा सर्वे महावितरण कंपनीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी करण्यात आला. या सर्वेदरम्यान नवीन वस्त्यांमध्ये १६७ नवीन विद्युत खांब बसविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जुन्या ९६ विद्युत खांबांवर पथदिवे लावण्यात आले नाही. त्यामुळे या खांबावर पथदिवे लावण्यासाठी वायर टाकणे आवश्यक आहे, असा अहवाल नगर परिषदेकडे सादर करण्यात आला. या अहवालावरून नगर परिषदेने प्रस्ताव तयार केला. न. प. च्या मान्यतेनंतर सदर प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला. निविदा काढून विद्युत खांब उभारण्याच्या कामाला दोन दिवसांपासून सुरूवात झाली आहे. (नगर प्रतिनिधी)