शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

IAS शुभम गुप्तांनी सूड उगवला! बेघर केले, खोट्या गुन्ह्यातही गोवले, आदिवासी महिलेची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत

By संजय तिपाले | Updated: August 20, 2024 14:40 IST

Gadchiroli News: दुधाळ गाय वाटप योजनेते गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले आयपीएस सांगली - मिरज - कुपवाडचे विद्यमान महापालिका आयुक्त व भामरागड येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्याविरुध्द तक्रारींचा ओघ सुरुच आहे.

- संजय तिपाले गडचिरोली - दुधाळ गाय वाटप योजनेते गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले आयपीएस सांगली - मिरज - कुपवाडचे विद्यमान महापालिका आयुक्त व भामरागड येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्याविरुध्द तक्रारींचा ओघ सुरुच आहे. १९ ऑगस्टला भामरागडातील एका आदिवासी महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कैफियत मांडली आहे. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार स्वाक्षरी न केल्याने   बेघर करण्याची धमकी दिली, काही दिवसांनी खरोखरच माझा संसार रस्त्यावर आणला, मला खोट्यात गुन्ह्यात गोवले तर पतीला कार्यालयात बोलावून धमकावले, अशा आशयाची तक्रार भारती इष्टाम या महिलेने केली आहे.

भारती इष्टाम या भामरागडच्या रहिवासी असून त्यांच्याकडे गॅस एजन्सी आहे. शिवाय विविध सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. १९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शुभम गुप्तांवर गंभीर  स्वरुपाचे आरोप केले आहेत. एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी व भामरागडमध्ये आदिवासी एकात्मिक प्रकल्प  अधिकारी असलेल्या आयएएस शुभम गुप्ता हे २०२१-२२ मध्ये भामरागड नगरपंचायतीचे प्रशासक देखील होते. भामरागड नगरपंचायत इमारतीसाठी ०.९९ हेक्टर जागा हस्तगत करण्यासाठी वनहक्क समितीचा ठराव आवश्यक होता. वनहक्क समितीवर मी देखील होते. या समितीच्या ठरावासाठी शुभम गुप्ता यांनी कार्यालयात बोलावले. सह्या व ठराव न दिल्यास उध्वस्थ करण्याची धमकी दिली.

मी विरोधावर ठाम राहिल्याने माझ्यावर त्यावेळचे तहसीलदार अनमोल कांबळे व नगरपंचायतीचे अधिकारी सूरज जाधव यांच्याकरवी दबाव आणण्यास सुरुवात केली. याच दरम्यान माझ्या गॅस एजन्सीची तपासणी केली, त्यात काही न आढळल्याने मला जागा खाली करायला लावली. त्यानंतर वारंवार पत्र पाठवून मला त्रास देण्यास सुरुवात केली. या दरम्यान माझ्यावर कलम १०७ व कलम १११ अन्वये गुन्हा नोंद केला. शिवाय पतीला कार्यालयात बोलावून धमकावले. माझी मुले शिक्षणासाठी बाहेर होती, मानसिक ताणतणावात त्यांना मी पैसे पुरवू शकले नाही, त्यामुळे त्यांचे शिक्षण सुटले, असेही पत्रात नमूद आहे. ... यापेक्षी लाजीरवाणी बाब नाहीभारती इष्टाम यांनी पत्रा नमूद केल्यानुसार , मी शुभम गुप्तांविरोधात अनेकांकडे दाद मागितली, उंबरठे झिजवले, पण न्याय मिळाला नाही. मला बेघर करुन, खोट्या गुन्ह्यात गोवून सूड उगविणाऱ्या गुप्तांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. एका अदवािसी महिलेची हालअपेष्टा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वाट्याला असा वाईट अनुभव येत असेल तर यापेक्षा लाजीरवाणी बाब नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. गुप्ता म्हणतात, माझी काहीच प्रतिक्रिया नाही यासंदर्भात आयएएस शुभम गुप्ता यांना संपर्क केला असता मला याबाबत काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे आता या तक्रारीची शासन स्तरावरून शहानिशा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली