शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या जंगलात यावर्षी ११ हजार वणव्यांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:59 IST

राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे.

- मनोज ताजने गडचिरोली : राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी २० टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात यावर्षी तब्बल ११ हजार आगीच्या घटनांची नोंद घेण्यात आली आहे. वनौपज गोळा करताना पालपाचोळा आणि सरपटणा-या प्राण्यांचा अडथळा दूर करण्यासाठी वनालगत राहणा-या नागरिकांकडून सदर आगी लावल्या जातात. आगींचे प्रमाण पाहता नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती कुचकामी ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल १२ हजार ८६७ चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल पसरलेले आहे.रोजगाराची साधनं नसल्यामुळे जंगलालगत राहणारे लोक उन्हाळ्यात तेंदूपाने, मोहफूल व इतर वनौपज गोळा करून त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह करतात. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी तेंदूपानांचा हंगाम जोमाने सुरू असतो. पेसा कायद्याने गावालगतच्या जंगलातील वनसंपत्तीवर हक्क मिळालेल्या ग्रामसभा तेंदूपाने खरेदी करून बाहेरील कंत्राटदारांना विकतात. यातून कोट्यवधीची उलाढाल होते. तेंदूपाने गोळा करणे सोपे जावे म्हणून उन्हाळ्यात खाली पडणारा झाडांचा पालापाचोळा जाळण्यासाठी आगी लावल्या जातात. ही आग पसरत जाऊन शेकडो किलोमीटरचा परिसर कवेत घेते. अनेक वेळा शेतक-यांकडून धु-यावर लावलेली आग पसरत जाऊन जंगलात पसरते. या आगीत मोठ्या वृक्षांची फारशी हाणी होत नसली तरी रोपटे, प्राण्यांना जीव गमवावा लागतो. क्षेत्र मोठे आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे आगीचे नियंत्रण अनेक वेळा हाताबाहेर जात आहे.

फायर लाईन व जनजागृतीवर मोठा खर्चजंगलात लावल्या जाणा-या आगी दूरपर्यंत न पसरता मर्यादित राहाव्यात यासाठी फायर ब्लोअरच्या मदतीने विशिष्ट रेषेत पालापाचोळा मोकळा करून फायर लाईन (जाळ रेषा) तयार केली जाते. त्यासाठी ७३५ वनक्षकांकडे फायर ब्लोअर हे यंत्र देण्यात आले आहे. त्यातून निघणा-या हवेच्या दाबाने पालापाचोळा साफ होऊन आग पसरण्यापासून रोखता येते. या यंत्राच्या वापरावर आणि आगी न लावण्याबाबत गावागावात जनजागृती करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्या तुलनेत आगीचे प्रमाण कमी करण्यात वनविभागाला अपेक्षित यश आलेले दिसत नाही.सॅटेलाईट अलर्टमुळे अहोरात्र कामआता जंगलात कुठेही आग लागल्यास सॅटेलाईट ती आग टिपून वन अधिकाºयांच्या मोबाईलवर सतत त्याचा संदेश येत असतो. त्यामुळे आग नेमकी कुठे लागली याची माहिती वनविभागाला लवकर मिळण्यास मदत होते. परंतू वनकर्मचारी तिथे पोहोचेपर्यंत आग बरीच पसरलेली असते. ज्या भागात आधीच फायर लाईन तयार केलेल्या आहेत त्या भागात आग मर्यादित स्वरूपात राहते.

 

कोट...गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. इतर जिल्ह्यांत एका वनरक्षकाकडे ५०० ते ८०० हेक्टरचा परिसर असताना या जिल्ह्यात एका वनरक्षकाला ११०० ते ४५०० हेक्टरचा परिसर सांभाळावा लागतो. बीट लहान करून वनरक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविला आहे.- एस.एल. बिलोलीकर, उपवनसंरक्षक (दक्षता)