शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत वन विभागच साफ करणार मोहफुलाखालील पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 11:20 IST

मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटनांवर नियंत्रणाचा प्रयत्न ८०० ब्लोअर मशिन खरेदी करणार

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमागे मोहफूल वेचण्यासाठी पालपाचोळा जळावा म्हणून लावलेला मानवनिर्मिती वणवा कारणीभूत असल्याचे वनविभागाच्या अभ्यासात लक्षात आले. त्यामुळे आता आगी लावून पालापाचोळा जाळण्याऐवजी मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा वनविभागच साफ करून देणार आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात आणखी ८०० ब्लोअर मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७६ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख १३ हजार ७१५ मोहाची झाडे आहेत. मोहफुलापासून विविध पदार्थ तयार करता येत असल्याने मोहफुलांना चांगली किंमत मिळते. विशेष म्हणजे, मोहफुलासाठी कोणतेही अतिरिक्त श्रम किंवा गुंतवणूक करावी लागत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात मोहफूल वेचण्याकडे नागरिकांचा कल असतो. मोहफूल जमिनीवर पडत असल्याने ते वेचावे लागतात. त्यासाठी पालापाचोळा साफ करणे गरजेचे असते. प्रत्येक झाडाखालील कचरा साफ करणे शक्य नसल्यामुळे लोक मोहाच्या झाडाखालील कचºयाला आग लावतात. ही आग पुढे जंगलात पसरून त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. यात जंगल व जैवविविधतेचे मोठे नुकसान होते.वन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक आगी मोहफूल वेचण्याच्या उद्देशाने लावण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये जंगलातील आगीच्या ११ हजार ७९६ घटनांची नोंद आहे. त्यामध्ये मोहफूल वेचण्यासाठी ६ हजार ७१८ आगी लागल्या आहेत.आगीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी वनविभाग आता ब्लोअर मशिनच्या सहाय्याने मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा स्वच्छ करून देणार आहे. गडचिरोली वनवृत्त कार्यालयाकडे सध्या ६८२ ब्लोअर मशिन आहेत. यावर्षी पुन्हा ८०० मशिन खरेदी केल्या जाणार आहेत.

झाडाखाली जाळी लावण्याचा प्रयोग फसलाआगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षी वन विभागाने काही गावातील नागरिकांना जाळ्या वितरित केल्या होत्या. या जाळ्या जमिनीपासून जवळपास दोन फूट उंचीवर मोहाच्या झाडाखाली बांधल्या होत्या. दिवसभर पडलेले मोहफूल जाळीत जमा करून गोळा करावे लागत असे. त्यामुळे मोहफूल वेचण्याचीही गरज नव्हती. जाळीत मोहफूल पडल्याने स्वच्छ मोहफूल उपलब्ध होईल, हा सुध्दा उद्देश होता. मात्र बहुतांश नागरिकांनी जाळ्यांचा दुरूपयोग केला. तसेच जाळीमुळे एखाद्या वन्यजीवाचा जीव जाण्याचाही धोका होता. परिणामी जाळी वितरण यावर्षीपासून बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग