शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर चढलेल्या अस्वलाला उतरविण्यासाठी गडचिरोली वनविभागाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 13:56 IST

गोमनी तालुक्यातील खुदीरामपल्ली गावात आज शुक्रवारी सकाळी अस्वलाचे दर्शन झाले. अस्वलाला गावात पाहून लोकांनी एकच गर्दी केली.

ठळक मुद्देलोकांची एकच गर्दीअस्वल काही उतरेना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:- गोमनी तालुक्यातील खुदीरामपल्ली गावात आज शुक्रवारी सकाळी अस्वलाचे दर्शन झाले. अस्वलाला गावात पाहून लोकांनी एकच गर्दी केली. लोकांची गर्दी बघून अस्वल गावा शेजारी असलेल्या नाल्याजवळच्या झाडावर बसला. त्याला उतरवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सकाळपासून मेहनत घेत आहेत. मात्र अस्वल काही झाडावरून उतरण्याचा नाव घेत नसल्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.खुदीरामपल्ली आणि आंबटपल्ली या दोन गावांमध्ये एक मोठा नाला आहे. या नाल्याचा बाजूला असलेल्या मोठ्या झाडावर अस्वल ठाण मांडून बसले आहे. लोकांचा जमाव असल्याने त्याच्या मनात भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन अस्वलाला उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी दोन्ही गावातील लोकांनी अस्वलाला बघण्यासाठी एकच गर्दी केली आहे.सकाळपासून वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊसाहेब जव्हरे आणि त्यांची चमू लोकांना अस्वलापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून जमावाला दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अस्वल गावात येण्याचा हा पहिलाच प्रकार असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी आता काय करणार आणि अस्वल झाडावरून उतरणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत अस्वलाने लोकांच्या आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे

टॅग्स :wildlifeवन्यजीव