शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: अन्नदात्यांना शत्रूसारखी वागणूक! शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांचे समर्थन

By संजय तिपाले | Updated: February 22, 2024 14:57 IST

Gadchiroli News: शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. अन्नदाता म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार शत्रूसारखी वागणूक देत असल्याचा आरोप करुन दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीने हे पत्रक जारी केले आहे.

- संजय तिपालेगडचिरोली - शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. अन्नदाता म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार शत्रूसारखी वागणूक देत असल्याचा आरोप करुन दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीने हे पत्रक जारी केले आहे.

शेतीमालाला किमान आधारभूत किंमत कायदा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, कर्जमाफी, २०१३ भूसंपादन कायदा रद्द करावा, अशा विविध १३ मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राजधानी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना   पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवरील ‘शंभू बॉर्डर’वर रोखण्यात आले आहे. काटेरी कुंपण, पोलिस बाळाचा वापर करून अन्नदात्यांना शत्रूसारखी वागणूक देण्यात येत असल्याचा माओवाद्यांचा आरोप आहे. आंदोलन दडपण्यासाठी गोळीबारसुद्धा करण्यात आला. त्यांना दहशतवादी, देशद्रोही म्हणून संबोधण्यात येत आहे. आदिवासी भागात देखील अशीच दडपशाही सुरू असून पाचवी अनुसूची लागू न करता त्यांच्या जल, जंगल जमिनीवर अतिक्रमण करण्यात येत आहे. दुसरीकडे काही उद्योगपतींवरील ७- ८ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. त्यांच्यासाठी नियम व कायदे वाकवून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पत्रकात नमूद आहे.

पोलिस बळाचा वापर करुन झाडांची कत्तलखनिजांसाठी छत्तीसगडमधील हसदेव जंगलातील झाडे कापण्यात येत आहे. बस्तरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बळ तैनात करून पर्यावरणाचे सर्व कायदे धाब्यावर बसविण्यात येत आहेत. विरोध करणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरविण्यात येत आहे, असा दावा माओवाद्यांनी केला आहे. १६ फेब्रुवारीच्या भारत बंदला नक्षल्यांनी समर्थन दिले होते. यासंदर्भातील नक्षल्यांचे पत्रक २२ फेब्रुवारीला समाजमाध्यमावर व्हायरल झाले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीFarmers Protestशेतकरी आंदोलन