शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली विभागात एसटीचे ३० कोटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:57 IST

गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यांतर्गत वाहतुकीला प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला सुरूवात होऊन अडीच महिने झाले, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने एसटीच्या अजूनही मोजक्याच फेऱ्या धावत आहेत. त्यामुळे दिवसागणिक एसटीच्या तोट्यात भर पडत आहे. गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

२२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासून ३ मे पर्यंत बससेवा पूर्णपणे बंद होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ४ मे पासून गडचिरोली जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र अजुनही बसला प्रवासी मिळत नसल्याने बहुतांश मार्गांवरील बसफेऱ्या बंदच आहेत. काही मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र त्यांच्यामध्ये केवळ ३० ते ४० टक्के भारमान मिळत आहे. परिणामी एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सोडल्या जात आहेत.

सामान्य परिस्थितीत गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी आगार मिळून एसटीला दरदिवशी ३ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र लॉकडाऊनपासून या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. मार्च महिन्यात ३ कोटी ७ लाख, एप्रिल महिन्यात १० कोटी ५१ लाख, मे महिन्यात ८ कोटी ३४ लाख, जून महिन्यात ७ कोटी ७५ लाख असे एकूण २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र बसेस बंद असल्याने हे उत्पन्न आले नाही.

३ कोटी रुपयांची उधारीगडचिरोली विभागातील ३ आगारांमध्ये महिन्याला १० कोटींचे उत्पन्न बुडत असताना दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च मात्र सुरूच आहे. त्यामुळे एसटीचा तोटा गंभीर स्वरूप धारण करीत आहे. ३ कोटी १० लाख रुपयांची उधारी शिल्लक आहे. यामध्ये डिझेलचे ६१ लाख, एलआयसीचे २४ लाख, एसटी बँकचे १ कोटी १२ लाख आदींचा समावेश आहे. व्यवहार सुरू होऊन एसटीला प्रवासी मिळेल तेव्हाच परिस्थिती सुधारू शकते.

टॅग्स :state transportएसटी