शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात तीन पिढ्यांची ‘गळ उत्सव’ परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 11:49 IST

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चारही जिल्ह्याच्या सुमारे ३५ चौरस किमीचा भूक्षेत्र झाडीपट्टी म्हणून नावाजलेला आहे. झाडीपट्टीत गेली शेकडो वर्षांपासून विशेषदिनी सण, उत्सव, यात्रा साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे.

ठळक मुद्देकोंढाळा येथे धार्मिक कार्यक्रमडहाक्यांनी वाजतगाजत काढली जाते मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रांतात अतिपूर्वेकडील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चारही जिल्ह्याच्या सुमारे ३५ चौरस किमीचा भूक्षेत्र झाडीपट्टी म्हणून नावाजलेला आहे. झाडीपट्टीत गेली शेकडो वर्षांपासून विशेषदिनी सण, उत्सव, यात्रा साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील नावलौकिकप्राप्त कोंढाळा गावात मागील तीन पिढ्यांच्याही आधीपासून होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी मेघनाद जत्रा ‘गळ उत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोंढाळास्थित बुराडे कुटुंबीय सदर गळ उत्सवाचे नेतृत्व करते. सर्वप्रथम ठाणा म्हणजे देविदेवतांची पेटी डहाक्यांच्या साथीने वाजतगाजत विधिवत गळ ज्या ठिकाणी साजरा केला जातो, त्या स्थळी नेली जाते. प्रारंभीच्या काळात वनवैभवाने नटलेल्या या परिसरात झाडांची खूप गर्दी होती. त्यामुळे मोह झाडापासून बनवलेला लाकडी खांब चारपाच बैलबंड्यांच्या साथीने जंगलातून थेट गावात आणला जात असे. पण आता गावातील एका चौकात पूर्वी लाकडांपासून परंतु आता सिमेंट काँक्रिटने बांधलेले स्थायी उंच दंडगोलाकार खांब उभे केलेले आहेत. या खांबाच्या वरच्या टोकावर आडवी पट्टी आणि त्याला लांब दोर बांधला जातो. डहाक्यांच्या आवाजात येथे पूजापाठ केली जाते. या उत्सवात गावकरी तसेच पंचक्रोशीतील जनता आनंदात सहभागी होते. लहानमोठ्या दुकानांनी कोंढाळाची रस्ते व मोकळी जागा भरून जात असल्याने गावाला या दिवशी जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात मनोरंजनाची अनेकविध साधने हातात उपलब्ध झाल्याने सदर गळ उत्सवाला पूर्वीच्या सुरुवातीच्या कालखंडात लोकसंघटीत करून त्यामधून एकोपा आणि मनोरंजन अशी दुहेरी कला साधून हा उत्सव साजरा केला जायचा. मात्र आज बदलत्या काळानुसार या उत्सवाची ऊर्जा आणि गर्दी कुठेतरी लोप पावत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक