शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना पडला विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:01 IST

बेकायदेशीर मुरुमाचा उपसा : कंत्राटदाराला अभय कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :गडचिरोली चामोर्शी - आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम, रेतीचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना ५ एप्रिल रोजी आदेश जाहीर करीत कारवाईचे आदेश दिले. मात्र, साडेतीन महिने उलटून गेले तरी याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्या कंत्राटदाराला अभय दिले जात असल्याचे दिसून येत आहे. 

गडचिरोली चामोर्शी आष्टी या राज्य महामार्गाच्या बांधकामात संबंधित कंत्राटदाराने या मार्गावरील अवैध मुरुमाचे उत्खनन करीत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे तक्रार करीत माहिती मागितली होती. मात्र, त्यांनी अपुरी माहिती देत प्रकरण निकाली काढले. त्यामुळे ताटीकोंडावार यांनी गडचिरोली व चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी तसेच गडचिरोली, चामोर्शीचे तहसीलदार यांच्यावर शास्तीची कार्यवाही करण्यासंदर्भात १० जून २०२१ रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

तब्बल दोन वर्षांच्या सुनावणीनंतर नागपूर खंडपीठाने संबंधित चारही अधिकाऱ्यांकडे शास्तीची कार्यवाहीकरिता खुलासा मागितला. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यावर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करण्याचे खंडपीठाने पत्रात नमूद केले.

खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना ५ एप्रिल रोजी आदेश जारी करीत उचित कारवाई करून प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. न्यायालयाचे निर्देश असतानाही प्रशासन गप्प आहे. याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरत असल्याचा संशय निर्माण होत आहे, असा आरोप संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दोषी, पण कारवाई काहीच नाहीतब्बल दोन वर्षांनंतर माहिती अधिकार खंडपीठ, नागपूर येथे झालेल्या सुनावणीत गडचिरोली, चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे प्रथमदर्शी दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई अपेक्षित होती. पण, कुठलीही कारवाई झाली नाही. यानंतर गडचिरोली तहसीलदार, उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी मौखिक स्पष्टीकरण दिले. यानुसार खनिकर्म अधिकाऱ्यांनी खंडपीठात अहवाल दिला.

खंडपीठाने आदेश दिल्यानंतरही"जिल्हाधिकारी संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करत नाहीत, याचा अर्थ काय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खंडपीठाच्या आदेशाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून उल्लंघन होत असल्याने आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे."- संतोष ताटीकोंडावार, याचिकाकर्ते 

टॅग्स :mafiaमाफियाGadchiroliगडचिरोली