शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'गडचिराेली मध्यवर्ती' ठरली क्यूआर काेड सेवा देणारी राज्यातील पहिली बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 12:38 IST

आरटीजीएस, युपीआय, एटीएम यांसारख्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध आहेत. त्यात आता क्यूआर काेडची भर पडली आहे.

ठळक मुद्देदुर्गम भागात शाखा असूनही तंत्रज्ञानात अग्रेसर

गडचिराेली : गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५ एप्रिलपासून ग्राहकांसाठी क्यूआर काेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा बहुमान पटकाविणारी राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी ही पहिली बँक ठरली आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थिती अतिशय वाईट आहे. अशा स्थितीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र याला अपवाद ठरत आहे. राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बँकांपेक्षाही अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. आरटीजीएस, युपीआय, एटीएम यांसारख्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध आहेत. त्यात आता क्यूआर काेडची भर पडली आहे.

डिजिटल बँकिंगमध्ये क्यूआर काेडचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाभरातील व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत क्यूआर काेड सेवेचा शुभारंभ ५ एप्रिल राेजी गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरविंद पाेरेड्डीवार, बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सीईओ सतीश आयलवार आदी मान्यवर उपस्थित हाेते.

सर्वांत कमी एनपीए असणारी बँक

बॅँकेचा एनपीए (नाॅन परफार्मिंग असेट) १० टक्क्यांपेक्षा कमी असावा, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. मात्र, राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ही मर्यादा ओलांडली आहे. एनपीए वाढल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. अशा स्थितीत आदिवासीबहुल भागात शाखा असलेल्या गडचिराेली सहकारी बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के व ग्राॅस एनपीए १.२२ टक्के एवढा आहे. विशेष म्हणजे, राज्यात सर्वांत कमी एनपीए सातारा बँकेनंतर गडचिराेली बँकेचा आहे. ही बाब गडचिराेली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रGadchiroliगडचिरोली