शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

भक्तीरसात न्हाऊन निघाले गडचिरोली शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:46 IST

भगवद्गीतेतील संदर्भ देत जीवनात आचरणात आणण्याच्या चांगल्या गोष्टींची शिकविण देणाºया भागवत कथा ज्ञानयज्ञाचा गुरूवारी मोठ्या उत्साहात ....

ठळक मुद्देभागवत कथायज्ञाचा समारोप : शेवटच्या दिवशी सात हजारांवर नागरिकांनी घेतला महाप्रसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भगवद्गीतेतील संदर्भ देत जीवनात आचरणात आणण्याच्या चांगल्या गोष्टींची शिकविण देणाºया भागवत कथा ज्ञानयज्ञाचा गुरूवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात समारोप झाला. यावेळी ७ ते ८ हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत अशा पद्धतीच्या भव्य स्वरूपात भागवत कथा महायज्ञाचे आयोजन नगराध्यक्ष योगिता पिपरे व नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या पुढाकाराने केले होते. २ ते ८ नोव्हेंबर असे सात दिवस राजारामजी काबरा स्मृति सभागृहाच्या प्रांगणात झालेल्या कथायज्ञाचे पं.विनोद बिहारी गोस्वामी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रवण करण्यासाठी दररोज ५ हजारावर नागरिक हजेरी लावत होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवापासून तर कृष्ण-सुदाम्यातील मैत्रीपर्यंत अनेक प्रसंग विशेष आकर्षण ठरले.गडचिरोलीच नाही तर बाहेर गावावरूनही अनेक लोक भागवत कथा ऐकण्यासाठी दररोज येत होते. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरणाची अनुभती येत होती. जीवन जगताना स्वार्थ आणि परमार्थ यातील भेद स्पष्ट करून गरीब-श्रीमंती, मानवी स्वभावातील दुर्गुणांवर मात करून चांगल्या संगतीने आयुष्य कसे सार्थकी लावता येते हे पं.गोस्वामी यांनी उदाहरणासह पटवून दिले. या सुश्राव्य कथेत सर्वजण दररोज ४ तास रममाण होत होते.असे भव्य आयोजन गडचिरोलीत केल्याबद्दल अनेकांनी पिपरे दाम्पत्याचे आभार व्यक्त केले. संपूर्ण कथा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी राधेश्याम काबरा, पं.स.उपसभापती विलास दशमुखे, न.प.चे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड, शालीग्राम विधाते, अनिल म्हशाखेत्री, प्रकाश बारसागडे, अमोल दशमुखे, नरेंद्र माहेश्वरी, प्रवीण मुक्तावरम, नगरसेवक काटवे, डॉ.कुंभारे आदी अनेकांनी परिश्रम घेतले.नेटके व शिस्तबद्धपणे झालेले अशा प्रकारचे आयोजन वारंवार गडचिरोली जिल्ह्यात व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.