शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली शहर पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:17 IST

हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जमा झाले. त्यामुळे गडचिरोली शहरातील काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा सोमवारच्या रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. काही नाले व नद्यांवरील पुलांवर पाणी चढले होते. त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. सखल भागात असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले.गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील कन्नमवार नगरात गुडघ्यापेक्षा अधिक पाणी जमा झाले होते. वाहत्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनींनी गर्दी केली होती. राधे बिल्डींग परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने पोलिसांनी एका बाजूने वाहतूक बंद केली होती. आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या नाका परिसरात पाणी साचले होते. मूल मार्गावरील आयटीआय ते गोकुलनगर मार्गालगतच्या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. आयटीआयच्या समोर मुख्य महामार्गावर अधिक पाणी असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गाने वळती केली जात होती. दुपारी पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर