शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

स्वच्छतेत गडचिरोली शहर राज्यात शेवटून तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

२०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले.

ठळक मुद्देदेसाईगंज ३१ व्या स्थानावर : सर्व नगर पंचायतींची स्थितीही लाजीरवाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ चा निकाल जाहीर केला आहे. त्यात गडचिरोली शहराने राज्यातून सर्वात शेवटून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. देसाईगंज शहराची स्थिती थोडी चांगली आहे. या शहराने १०७ शहरांपैकी ३१ वा क्रमांक पटकाविला आहे.शहरी भागात स्वच्छता राहावी यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाते. या निधीचा उपयोग करून स्वच्छतेचे विविध उपक्रम शहरात राबवायचे असतात. त्यानंतर बाह्य समितीकडून पाहणी केली जाते. २०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली शहराला ४६ वे स्थान मिळाले आहे. म्हणजेच राज्यातून सर्वात शेवटून तिसरे स्थान मिळाले. यावरून शहरातील स्वच्छतेचा अंदाज येण्यास मदत होते. राज्यातील इतर शहरे स्वच्छतेत देशात आघाडीवर असताना गडचिरोली शहराने शेवटून तिसरे स्थान पटकाविणे ही बाब शहरवासियांसाठी लाजीरवाणी ठरत आहे.नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यास गडचिरोली नगर परिषद अपयशी ठरली असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दरवर्षी स्वच्छतेत गडचिरोली शहर माघारत चालले आहे. गडचिरोली शहराने स्वच्छतेबाबतचे नियोजन करून पुढील वर्षी स्वच्छतेत चांगले स्थान मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.२५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देसाईगंज शहर सहभागी झाले होते. या गटात राज्यातील एकूण १०७ शहरे सहभागी झाली होती. त्यात देसाईगंज नगर परिषदेने ३१ वा क्रमांक पटकाविला आहे. या शहराने पहिल्या दहामध्ये स्थान पटकाविले नसले तरी गडचिरोली शहरापेक्षा या शहराची स्थिती थोडी चांगली असल्याचे दिसून येते.मुलचेराला राज्यातून शेवटचा क्रमांक२५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद व सर्व नगर पंचायतींचा समावेश होता. या गटात राज्यभरातून १८६ शहरे सहभागी झाली होती. त्यात मुलचेरा नगर पंचायतीला सर्वात शेवटचा १८६ वा क्रमांक मिळाला आहे. सिरोंचा नगर पंचायतीला १८५, अहेरी १८३, एटापल्ली १७६, भामरागड १६८, चामोर्शी १५७, कुरखेडा १२२,धानोरा ११७, आरमोरी ११० तर कोरचीने ४० वा क्रमांक पटकाविला आहे. सर्वच नगर पंचायतींना १०० च्या वरचे स्थान मिळाले आहे. मात्र कोरचीने ४० वे स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यातील इतर नगर पंचायतींनी कोरची नगर पंचायतीकडून स्वच्छतेचे धडे घेण्याची गरज आहे, जेणेकरून पुढील वर्षी किमान ५० मध्ये स्थान पटकाविता येईल.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान