शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली चकमक : ठार झालेल्या नक्षलींची संख्या 34 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 18:26 IST

पोलीस आणि नक्षलींमध्ये  22 एप्रिलला छत्तीसगड सीमेजवळील जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या आता 34 वर पोहोचली आहे.

गडचिरोली : पोलीस आणि नक्षलींमध्ये  22 एप्रिलला छत्तीसगड सीमेजवळील जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या आता 34 वर पोहोचली आहे. शनिवारी (28 एप्रिल) एका नक्षलीचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह त्याच परिसरातील जंगलात सापडला. या 34 जणांपैकी 18 जणांची ओळख पटली असून 13 मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शनिवारी शोधमोहीमेदरम्यान एका नक्षलीचा कुजलेला मृतदेह इंद्रावती नदीच्या अलिकडील जंगलात सापडला. परंतू मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. 

आतापर्यंत ओळख पटलेल्या 18 जणांच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र त्यापैकी 5 जणांचे मृतदेह अजून नातेवाईकांनी ताब्यात घेतलेले नाहीत. त्यात सुमन कुळयेटी (पडतनपल्ली, ता. भामरागड), शांताबाई उर्फ मंगली पदा (रा.गंगालूर, जि.बिजापूर, छत्तीसगड), तिरूपती उर्फ धर्मू पुंगाटी (रा.केहकापाहरी, ता.भामरागड), राजू उर्फ नरेश कुटके वेलादी (रा.जिजगाव, ता.भामरागड), क्रांती (रा.बस्तर, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून ते मृतदेह ताब्यात घ्यावेत, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

तसेच इतर मृतदेहांना कोणी ओळखत असतील तर त्यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली किंवा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपर्क साधावा, असेही आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे. नक्षलविरोधी अभियानात ऐतिहासिक ठरलेल्या 22 एप्रिलला झालेल्या चकमकीत 16 मृतदेह जंगलात तर 17 मृतदेह इंद्रावती नदीत सापडले होते. आता आणखी एक मृतदेह जंगलात सापडल्यानंतर चकमकीतील एकूण मृतांची संख्या 34 वर पोहोचली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली