शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत १४ कोरोनामुक्त तर नवीन ३५ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 20:59 IST

35 नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे 24 जण बाधित आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सक्रिय कोरोना बाधितांपैकी शुक्रवारी जिल्हयात 14 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 4, वडसा 1, कुरखेडा 1, चामोर्शी येथील 1, आरमोरी 1, एटापल्ली 6 असे एकूण 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर 35 नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे 24 जण बाधित आढळून आले. यामध्ये एक सीआरपीएफ, दोन चंद्रपूरचे आहेत. आरमोरी येथील 1 प्रवासी, सिरोंचा 2, कुरखेडा 5, वडसा 3 यामध्ये एक एसआरपीएफचा समावेश आहे असे आज एकुण 35 नवीन कोरोना बाधित आढळले.यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 325 झाली असून एकुण बाधित संख्या 1503 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 1176 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.कुरखेडा येथील आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनामुळेचकुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याची एन्टीजन कोरोना तपासणी सकारात्मक आली होती. याबाबत आरोग्य विभागाने त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट केले. यामुळे जिल्हयातील पहिल्या कोरोना रूग्णाच्या मृत्युची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हयाबाहेर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जिल्हयात एकूण दोन मृत्यू झाल्याच्या नोंदी आता पोर्टलवर करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस