लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्यात सहकार चळवळीची अतिशय वाईट अवस्था आहे. अशा स्थितीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती अतिशय मजबूत आहे. ही बँक सहकारी चळवळीला अपवाद आहे. या बॅँकेने नाबार्ड व ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे ग्राहक या बँकेसाेबत जाेडून आहे, असे प्रतिपादन गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ५ एप्रिल राेजी क्यूआर काेड सेवेचा शुभारंभ डाॅ. बाेकारे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. या कार्यक्रमाला बँकेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पाेरेड्डीवार, अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सीईओ सतीश आयलवार आदी मान्यवर उपस्थित हाेते. पुढे बाेलताना डाॅ. बाेकारे म्हणाले, खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांना मात देईल, अशा सेवा जिल्हा बँकेमार्फत दिल्या जात आहेत. बँका अडचणीत आहेत. अशा स्थितीत गडचिराेली जिल्हा बँकेची स्थिती मजबूत आहे. ही अपवादात्मक स्थिती आहे. खासगी बँका सामान्यांसाठी काम करीत नाही. मात्र जिल्हा बँक दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन डाॅ. बाेकारे यांनी केले. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील सामान्य ग्राहक लक्षात घेउन जिल्हा बॅंकेचे धाेरण आखले जाते. जिल्ह्यातील नागरिक प्रामाणिक व विनम्र आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हा बँक प्रगती करीत आहे, असे मार्गदर्शन केले.प्रास्ताविकातून सीईओ सतीश आयलवार यांनी बँकेच्या स्थितीबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हाभरातील जवळपास १०० व्यापारी उपस्थित हाेते.
संस्कृती व स्वभाव टिकविण्याची गरज- अरविंद पाेरेड्डीवार दुर्गम भागातील नागरिक गावाला गेल्यास ते घराला कुलूप लावले तरी त्याची चावी शेजाऱ्याकडे देतात व घराकडे लक्ष ठेवण्यास सांगतात. एवढा एकमेकांबाबत विश्वास नागरिकांमध्ये आहे. हा स्वभाव टिकवून ठेवण्याची गरज आहे. जिल्हा बँक आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांची कामे सुसह्य हाेतील, याकडे लक्ष देत आहे. डिजिटल साधनांच्या वापराबराेबरच सायबर क्राईमचे धाेके वाढले आहेत. याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन बँकेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पाेरेड्डीवार यांनी केले.
क्यूआर काेडचे फायदे
व्यापाऱ्यांसाठी क्यूआर काेड अतिशय फायद्याचा आहे. संबंधित खात्याचा क्यूआर काेड असल्यास बँक खाते क्रमांक सांगण्याची गरज नाही. संबंधित क्यूआर काेड ग्राहकाने स्कॅन केल्यानंतर थेट व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे पाठविता येतात. त्यामुळे व्यापाऱ्याचा श्रम, वेळ वाचण्यास फार माेठी मदत हाेते.