शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

डीटीएड् कॉलेजचे भवितव्य अंधारात

By admin | Updated: June 23, 2014 00:04 IST

जिल्ह्यात एक डायट व खासगी व्यवस्थापनाचे १७ असे एकूण १८ डीटीएड् अध्यापक विद्यालय आहेत. या सर्व कॉलेजचे मिळून १ हजार १४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र यंदा जिल्हाभरातून डीटीएड्च्या

शेकडो जागा शिल्लक राहणार : ११४० जागांसाठी फक्त १२० अर्ज स्वीकृतगडचिरोली : जिल्ह्यात एक डायट व खासगी व्यवस्थापनाचे १७ असे एकूण १८ डीटीएड् अध्यापक विद्यालय आहेत. या सर्व कॉलेजचे मिळून १ हजार १४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र यंदा जिल्हाभरातून डीटीएड्च्या शासकीय प्रवेशासाठी फक्त १२० नामाकंन अर्ज सादर करण्यात आले आहे. ८० टक्के शासकीय कोट्याचेही प्रवेश पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या १७ डीटीएड् कॉलेजचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येते.पूर्वी प्राथमिक शिक्षकांची हमखास नोकरी म्हणून हजारो युवक डीटीएड् अभ्यासक्रमाकडे वळत होते. शासनानेसुध्दा त्यावेळी राज्यभरात अनेक डीटीएड् कॉलेजची खैरात वाटली. मात्र आता डीटीएड् पदविका मिळवूनही नोकरीची खात्री नसल्याने या अभ्यासक्रमाकडे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात गडचिरोलीनजिक इंदाळा येथे एक शासकीय डायट कॉलेज आहे. गडचिरोली शहरात खासगी व्यवस्थापनाचे पाच डीटीएड् कॉलेज असून शहरातील सर्व कॉलेजची मिळून ४९० इतकी प्रवेश क्षमता आहे. धानोरा येथे खासगी व्यवस्थापनाचा एक, चामोर्शी शहरात एक, आष्टी येथे दोन, अहेरी येथे एक, भामरागड, सिरोंचा येथे एक, आरमोरी शहरात दोन, देसाईगंज शहरात एक, कुरखेडा येथे एक व वैरागड येथे दोन डीटीएड् कॉलेज आहेत. या कॉलेजमध्ये दरवर्षी २० टक्के व्यवस्थापन कोटा व ८० टक्के शासकीय कोट्यातून प्रवेश दिले जातात. (स्थानिक प्रतिनिधी)