शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ७३८ अस्थायी डॉक्टरांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:31 IST

: जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील इतर भागात रु ग्णसेवा देणाऱ्या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २९ आॅगस्ट २०१७ ला घेतला आहे.

ठळक मुद्देस्थायी करण्याचा निर्णयपण वर्षभरानंतरही अंमलबजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील इतर भागात रु ग्णसेवा देणाऱ्या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २९ आॅगस्ट २०१७ ला घेतला आहे. मात्र अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने त्या ७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे भवितव्य अंधारातच दिसून येत आहे.राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर शासकीय रु ग्णालयात स्थायी डॉक्टर नाहीत. विविध पायाभूत सुविधांचीही कमतरता आहे. अशा स्थितीत गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील इतर संवेदनशील भागात मागील १५ ते २० वर्षांपासून आयुर्वेदसह इतर अभ्यासाचे एकूण ७३८ वैद्यकीय अधिकारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत आहेत. अत्यंत कमी पगारात ते रूग्णसेवा देतात. हलाखीच्या परिस्थितीत कमी वेतनात रुग्णसेवा देऊनही शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात सेवा देताना या अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू होणे गरजेचे होते, मात्र तीसुद्धा मिळाली नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ आॅगस्ट २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या डॉक्टरांना स्थायी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दीड वर्ष उलटूनसुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे.

गडचिरोलीसह राज्यातील दुर्गम भागात ७३८ वैद्यकीय अधिकारी प्रामाणिकपणे रुग्णसेवा देत आहते. आमच्या कुटुंबाससुद्धा सुरक्षित भविष्य आवश्यक आहे. त्यामुळे आम्हा सर्व अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्यात यावे अशी मागणी आहे.- डॉ.विशाल येर्रावार, मॅग्मो संघटना, गडचिरोली

टॅग्स :docterडॉक्टर