शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गाेंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी दरवर्षी २५ काेटींचा निधी उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

आता विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्याकडे जाण्याची आवश्यकता नसून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची संधी निर्माण होत आहे. काही दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज विद्यापीठाचा भाग झालेला असेल असे ते यावेळी म्हणाले.  गडचिरोली व चंद्रपूरमधील मुलांमध्ये गुणवत्ता चांगली असून, त्या गुणवत्तेला ओळखून विद्यार्थ्यांना कशात आवड आहे, त्यानुसार त्यांना क्षेत्र निवडायची संधी हवी, अशा सूचना यावेळी त्यांनी  विद्यापीठाला केल्या. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी जिथे जिथे अडचणी आल्या, त्या ठिकाणी जेवढे शक्य झाले तेवढे आपण सहकार्य केले. विद्यापीठाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत आपण खारीचा वाटा उचलला. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी दरवर्षी शासनाकडून किमान २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.गोंडवाना विद्यापीठाच्या दशमानोत्सव कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात ना. विजय वडेट्टीवार व महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ना. वडेट्टीवार बाेलत हाेते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी, महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे डॉ. निपुण विनायक, संस्थापक अध्यक्ष ज्ञान फाऊंडेशन, नागपूरचे अजिंक्य कोत्तावार, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील डॉ. राजेंद्र कुंभार, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, माजी आमदार डाॅ. नामदेवराव ऊसेंडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, व्यवस्थापन परिषदेचे व अधिसभेचे सदस्य, प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे आणि रुसाचे कन्सल्टंट डॉ. प्रमोद प्राभदेकर आदी उपस्थित होते.पुढे बाेलताना  ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, दुर्गम, मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आधी उच्च शिक्षणाची संधी नव्हती. आता विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्याकडे जाण्याची आवश्यकता नसून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची संधी निर्माण होत आहे. काही दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज विद्यापीठाचा भाग झालेला असेल असे ते यावेळी म्हणाले.  गडचिरोली व चंद्रपूरमधील मुलांमध्ये गुणवत्ता चांगली असून, त्या गुणवत्तेला ओळखून विद्यार्थ्यांना कशात आवड आहे, त्यानुसार त्यांना क्षेत्र निवडायची संधी हवी, अशा सूचना यावेळी त्यांनी  विद्यापीठाला केल्या. विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी आपल्या प्रास्ताविकात येथील युवावर्ग खूप सकारात्मक असून, विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना इतरांपेक्षा वेगळे करण्याची संधी दिली जात असल्याचे सांगितले. गोंडवाना विद्यापीठाला इतरांबरोबर स्पर्धा करायची नसून गोंडवाना विद्यापीठ एक ब्रँड बनायला पाहिजे. या विद्यापीठात मुलांना कौशल्यप्रधान व्हायला हवे, ज्यामुळे येथील विद्यार्थी काही नवीन करु शकतील. तसेच विद्यापीठाने तसे नियोजनही करण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.  उपस्थितांचे आभार कुलसचिव डाॅ. अनिल चिताडे यांनी मानले.

खरी संस्कृती,   प्रकृती, निसर्ग हा जंगल भागातच - नितीश भारद्वाज- सिनेअभिनेते नितीश भारद्वाज यांनी गोंडवाना विद्यापीठाचे व्हीजन मोठे असून, खरी संस्कृती ही इथेच कळून येत असल्याचे दिसते. वनवासी भागामध्ये उत्साह खूप असतो. खरी संस्कृती, प्रकृती, निसर्ग हा जंगल भागातच असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. उत्साह हा क्रीडा तसेच शैक्षणिक या दोन्ही कामांसाठी उपयोगी असतो. म्हणून  विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास व्हायला हवा. विद्यापीठाला १० वर्षे झाली असून विद्यापीठाचे व्हीजन पूर्ण करण्यास विद्यापीठ, विद्यार्थी तसेच सर्वांनी हातभार लावल्यास विद्यापीठाला यश निश्चितच लाभेल, असे मार्गदर्शन नितीश भारद्वाज यांनी केले. चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी काैशल्य विकास साधावा, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार