शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

संपूर्ण जागा हडपण्याचा डाव

By admin | Updated: April 8, 2016 01:21 IST

राखी ग्रामपंचायतीची मालकी असलेल्या सर्वे क्र. २ मधील ०.७६ आर क्षेत्रफळ जागेवर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापन करून संपूर्ण जागा हडपण्याचा प्रयत्न गावातील काही नागरिकांकडून चालविला जात आहे.

गडचिरोली : राखी ग्रामपंचायतीची मालकी असलेल्या सर्वे क्र. २ मधील ०.७६ आर क्षेत्रफळ जागेवर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापन करून संपूर्ण जागा हडपण्याचा प्रयत्न गावातील काही नागरिकांकडून चालविला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी राखीच्या उपसरपंच विद्या विनोद सातपुते यांच्यासह शेकडो नागरिकांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केली.राखी येथे बाजारासाठी ०.७६ हेक्टर आर जागा १९२२ पासून आरक्षित करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण जागेवर काही नागरिकांनी ९ मार्च २०१६ रोजी तारेचे कुंपन करून १२ मार्च २०१६ च्या रात्री बेकायदेशिररित्या बुद्ध मूर्तीची स्थापना केली. हा सर्व प्रकार अवैध असल्याने गावातील प्रमुख व्यक्ती या नात्याने उपसरपंच विद्या विनोद सातपुते यांनी सदर अतिक्रमण जिल्हाधिकारी यांना १५ मार्च रोेजी निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले. सदर जागा बाजारासाठी राखीव असल्याचा सातबारा आहे. राखी गाव विहीरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येते. राखी गावाच्या जागेवर गुरवळा येथील जनता अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे. चक्रपाणी रायपुरे, गुरूदास सेमस्कर, रमेश तुरे, योगीता बांबोळे हे गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, त्याचबरोबर या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच विद्या विनोद सातपुते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य धनराज भांडेकर, शशिकला मादमवार, भक्तदास नवघरे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला पीतांबर येलके, अशोक वासेकर, मनोज कुनघाडकर, देविदास फाफणवाडे, हिराजी नैताम, रामदास किरमिरे, रमेश सातपुते, खुशाल खोब्रागडे, दिलीप बोदलकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)