शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

फळ शेतीला मिळाले बळ

By admin | Updated: June 23, 2014 00:03 IST

एकूण शेती उत्पादनाच्या ९० टक्केपेक्षा जास्त उत्पादन धान पिकाचे घेतल्या जाते. धान पिकाचा रोवणी खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन व किंमत वाढत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा

गडचिरोली : एकूण शेती उत्पादनाच्या ९० टक्केपेक्षा जास्त उत्पादन धान पिकाचे घेतल्या जाते. धान पिकाचा रोवणी खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन व किंमत वाढत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना धान पिकाबरोबरच फळवर्गीय झाडांची लागवड करून फळ शेती करण्यास प्रोत्साहन करीत आहेत. आवश्यक असलेले रोपटे रोपवाटिकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.ृजिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन बाराही तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकासाठी अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. जिल्ह्यात चामोर्शी येथील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा जलसिंचन प्रकल्प नसल्याने दरवर्षीच एका पाण्याने पीक करपते. याचा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येत असला तरी नाईलाजास्तव धान पिकाचेच उत्पादन घेतले जात होते. दरवर्षी होणाऱ्या तोट्यामुळे येथील शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे. पारंपरिक धान पिकाच्या उत्पादनापेक्षा फळ पिकांची शेती लाभादायक ठरू शकते. महत्वाचे म्हणजे फळ पिकांच्या रोपट्यांची लागवड दरवर्षी करावी लागत नाही. त्यामुळे खर्च बराच कमी लागतो. संकरीत फळांच्या झाडांना दोन ते तीनच वर्षात फळ लागत असल्याने उत्पादन मिळण्यास सुरूवात होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान पिकाच्या शेतीपेक्षा फळ पिकाची शेती करावी, यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. आजची नवीन पिढी शेती करीत आहे. जिल्ह्यात रामगड, वाकडी, कृष्णनगर, सोनापूर, कसनसूर या पाच ठिकाणी शासकीय फळ रोपवाटीका आहेत. या फळरोपवाटीकांमध्ये आंबा, काजू, चिकू, पेरू, आवळा, सिताफळ, फणस, गिरीपुष्प, चिंच, कागदी लिंबू, शेवगा, करवंद, जांभुळ या फळ झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात येत आहे. या पाचही फळ रोपवाटीकांमध्ये दरवर्षी लाखो रोपटे लावली जात आहेत. ही रोपटे अत्यंत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. रामगड येथील रोपवाटिकेत वरील फळझाडांची सुमारे ५१ हजार ५१३? वाकडी येथे २४ हजार ५८३, कृष्णनगर २८ हजार ३१, सोनापूर १३ हजार ७५ व कसनसूर येथे ७ हजार ३६२ रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. ही रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी)