शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजवाल गाईप्रकरणी विश्वासघाताचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

सदर कंपनीचा संचालक घनश्याम तिजारे याला आरमोरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआरही दिला. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय महागड्या दुधाळू गाई परस्पर गायब केल्या असताना चोरी किंवा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रारीत या मुद्यावर जोर दिला नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे मुद्दे मागे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकंपनीच्या एका संचालकाला अटक : उर्वरित संचालकांवर कारवाई होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय लष्कराने शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी दिलेल्या जवळपास दोन कोटी रुपये किमतीच्या फ्रिजवाल गायी हडपण्याचा प्रयत्न करणाºया प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकावर अखेर सोमवार दि.६ च्या रात्री ११ वाजून १० मिनिटांनी विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी संचालक घनश्याम तिजारे याला अटक करण्यात आली असून दोन दिवसांचा पीसीआरही मिळाला आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते.सदर कंपनीचा संचालक घनश्याम तिजारे याला आरमोरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआरही दिला. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय महागड्या दुधाळू गाई परस्पर गायब केल्या असताना चोरी किंवा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रारीत या मुद्यावर जोर दिला नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे मुद्दे मागे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या ताब्यात असलेल्या गायी शेतकºयांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना कंपनीच्या संचालकांनी गायींची परस्पर विल्हेवाट लावणे ही शेतकºयांचीच नाही तर प्रशासकीय अधिकाºयांचीही फसवणूक आहे. याशिवाय गायी परस्पर घेऊन जाणे ही शासकीय मालमत्तेची चोरी आहे. त्यामुळे हे गुन्हे दाखल होणे गरजेचे असताना त्यावर भर दिलेला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आॅफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने गायी मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावापासून तर त्यांच्याकडे गायी सुपूर्द करण्यापर्यंतची कागदपत्रे मागितली आहेत. ही कागदपत्रे ८ जानेवारी रोजी न चुकता हजर करावी, असे तपास अधिकारी सहायक पो.निरीक्षक सी.बी.चौहान यांनी तक्रारकर्र्ते उपायुक्त डॉ.वंजारी यांना कळविले आहे. ही कागदपत्रे पुण्यावरून मागितली असल्याचे डॉ.वंजारी यांनी सांगितले.या प्रकरणात प्राप्त तक्रारीनुसार कारवाई केली जाणार असून तपासात आणखी काही मुद्दे पुढे येऊ शकतात, असे आरमोरीचे ठाणेदार दिगांबर सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.केवळ एकावरच गुन्हा का?प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने फ्रिजवाल गायी मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावात संचालक म्हणून घनश्याम तिजारे यांच्यासह इतरही काही संचालक मंडळाची नावे नमुद केली आहेत. त्यामुळे कंपनीच्या सर्व व्यवहारांसाठी संपूर्ण संचालक मंडळ जबाबदार असताना केवळ एकाच संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बाकी संचालकांवर केव्हा कारवाई होणार, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :cowगाय