शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

धानोरा विलगीकरण कक्षातील नागरिकांचा गावात मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM

धानोरा तालुक्यातील दोन नागरिक ३ जुलै रोजी केरळ राज्यातून परत आले. त्यांना धानोरा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ११ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही जण दारू पिऊन धानोरा येथे बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता, आपण क्वारंटाईन सेंटरमधील असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकोरोनाचा धोका : गावकऱ्यांनी दोघांना पकडून नेले सेंटरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले दोन नागरिक ११ जुलैच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास दारू पिऊन धानोरा येथे मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यामुळे कोरोनाचा संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धानोरा तालुक्यातील दोन नागरिक ३ जुलै रोजी केरळ राज्यातून परत आले. त्यांना धानोरा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ११ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही जण दारू पिऊन धानोरा येथे बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता, आपण क्वारंटाईन सेंटरमधील असल्याचे सांगितले. नागरिकांनी त्यांना पकडून क्वारंटाईन सेंटरमध्ये नेले. वसतिगृहाच्या दरवाजाच्यावर दोन शिक्षक कार्यरत होते. त्यांना सदर नागरिक कसे काय, बाहेर गेले, असे विचारले असता, मागील बाजूने दोघेजण बाहेर गेल्याने आम्हाला दिसले नाही, अशी माहिती संबंधित शिक्षकांनी दिली.याबाबत धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर व पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी भेट देऊन चौकशी केली असता, ३८ नागरिक क्वारंटाईन असल्याचे दिसून आले. जे दोघेजण धानोरा येथे दारू पिऊन फिरले त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र अजुनपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त झाले नाही. जर या दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यास नवीन संकट निर्माण होणार आहे. ते कोणाकडे दारू पिण्यासाठी गेले, त्यांना पकडून नेणारे नागरिक या सर्वांची तपासणी करावी लागेल.विलगीकरण कक्षातील नागरिक बाहेर जात असल्याने येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या