लाेकमत न्यूज नेटवर्क
चामाेर्शी : येथील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सभागृहात रविवारी आराेग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १३८ पुरुष व ११९ महिला अशा एकूण २५७ नेत्र रुग्णांची आराेग्य तपासणी करण्यात आली. यापैकी १०१ नेत्र रुग्णांची माेतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्यांना वर्धा सेवाग्राम येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
सांज मल्टिॲक्टीव्हीटी डेव्हल्पमेंट इन्स्टीट्यूट बिनागुंडा, भामरागड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात सेवाग्रामचे नेत्रतज्ज्ञ डाॅ. अजय शुक्ला यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली. तसेच वैद्यकीय चमूंनी माेतीबिंदू डाेळ्याची तपासणी केली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी विलास मेश्राम, सचिन माेहुर्ले, वनपाल वसाके, भाविक निकाेडे, प्रकाश कुमरे, प्रतीक वाढई, वैभव साेनटक्के, राेहित पेटकर, विशाल उराडे, ज्ञानेश्वरी चाटारे, अश्विना वाढई आदींनी सहकार्य केले. आयाेजक रूपलाल गाेंगले यांनी मार्गदर्शन केले.