वेळेपूर्वीच धानाचा निसवा : मालेरचेक येथील प्रकारचामोर्शी : जड धान म्हणून खरेदी केलेले बियाणे हलके निघाले असून वेळेपूर्वीच धान निसवले आहे. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झाली असून संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी मालेरचक येथील दिलीप वासेकर यांनी उपविभागीय कृषी अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.दिलीप विठोबा वासेकर यांनी खरीप हंगामासाठी कुनघाडा येथील कृषी केंद्र चालकांकडून श्रीराम धानाची बिजाई खरेदी केली होती. सदर धान १४५ दिवसात परिपक्व होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र सदर धान १४५ दिवसांच्या पूर्वीच निसवले आहे. सदर धान हलके असल्याचे स्पष्ट झाले आहे. हलके धान असल्यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे दिलीप वासेकर यांचे किमान ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वासेकर यांनी केली आहे. कुनघाडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बिजाई खरेदी केली आहे. त्यांचेही पीक वेळेआधीच निसवले आहे. मात्र त्यांनी तक्रार केली नाही. कृषी विभागाच्या मार्फतीने या परिसरात सर्वेक्षण करून नुकसानभरपाईची रक्कम कंपनीकडून वसूल करून ती शेतकऱ्यांना देण्याची मागणी आहे.
बोगस बियाणाने फसवणूक
By admin | Updated: October 7, 2015 02:32 IST