शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीचे आमदार घेणार चार गावे दत्तक

By admin | Updated: May 22, 2016 01:02 IST

भंडारा जिल्ह्याच्या साकोलीचे भाजप आमदार बाळ काशीवार यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिसंवेदनशील बोडूकसा, ...

सिरोंचा तालुका : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केली घोषणासिरोंचा : भंडारा जिल्ह्याच्या साकोलीचे भाजप आमदार बाळ काशीवार यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिसंवेदनशील बोडूकसा, किष्टय्यापल्ली, रमेशगुडम, रायगुडम हे चार गाव दत्तक घेण्याचा निर्णय २० मे रोजी सिरोंचा येथे जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील भाजप आमदार दुष्काळग्रस्त गावांना भेटी देत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साकोलीचे आमदार बाळ काशीवार १९ मे रोजी सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी या भागातील रूग्णालय, बँका आदींना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणली. याशिवाय त्यांनी काही गावांनाही भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आ. काशीवार यांनी प्रभारी तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांना चार गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. पंचायत समितीत त्यांनी आढावा बैठक घेऊन लोकांच्या समस्या त्वरित निकाली काढा, अशा सूचना केल्या. सिरोंचा येथील बँकेची पाहणी करून बँक अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या. शेतकऱ्यांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना सक्षमतेने पोहोचवा, असे ते बँक अधिकाऱ्यांना म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोडूकसा, किष्टय्यापल्ली, रमेशगुडम, रायगुडम हे गाव आपण दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले व याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरिगेलवार, तालुकाध्यक्ष कलाम हुसेन, शहर प्रभारी रमेश मारगौनी, बानय्या बेडके, अटला, सत्यनारायण मंचालवार, रवी गुडीमेटला आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)