शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती

By गेापाल लाजुरकर | Updated: March 14, 2024 16:39 IST

पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती.

गडचिराेली : पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती. अशीच एक दुर्दैवी घटना देसाईगंज तालुक्याच्या चिखली पेठ येथे मंगळवार १२ मार्च राेजी घडली. चारही मुलीच असलेल्या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांची शवयात्रा मुलींनीच १३ मार्च राेजी आपल्या खांद्यावर वाहून नेली व अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले.

देसाईगंज तालुक्याच्या चिखली पेठ येथील बाबूराव मडावी हे रहिवासी. बाबूराव आणि केमाबाई या दाम्पत्याला उत्तरा, अनुताई, ललिता आणि निराशा आदी चार मुली आहेत. मडावी दाम्पत्याने आपल्या चारही मुलींना शिक्षित करून त्यांचे याेग्य संगाेपन केले. त्यांचे विवाहसुद्धा उरकले. त्यांची मोठी मुलगी उत्तरा काेडापे ही गडचिराेली तालुक्यातील अमिर्झा येथे, दुसरी मुलगी अणूबाई उईके जाेगीसाखरा, तिसरी मुलगी नलू आत्राम फरी येथे तर सर्वात लहान निराशा ही काेरेगाव येथे राहते. मडावी यांच्याकडे जेमतेम दीड एकर काेरडवाहू शेती आहे. याच शेतीच्या भरवशावर ते आपला उदरनिर्वाह करीत हाेते. वृद्धत्वामुळे आजारपणात मुलीच त्यांचा सांभाळ करत होत्या. फरी येथील नलू आत्राम ही अधूनमधून त्यांची देखभाल करण्यासाठी येत असे. वृद्धापकाळामुळे १२ मार्च राेजी दुपारी १:३० वाजता बाबूराव यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी घरीच निधन झाले. बाबूराव यांना मुलगा नव्हता. त्यामुळे मुलींनीच अश्रूंना आवर घालून पार्थिवाला खांदा दिला. १३ मार्च राेजी सकाळी ११:३० वाजता धार्मिक रीतिरिवाजानुसार माती देऊन (मृतदेह गाडून) अंत्यसंस्कार पार पाडले.मुलीच करायच्या शुश्रूषा

बाबूराव मडावी व त्यांची पत्नी वृद्धत्वाकडे कललेल्या हाेत्या. त्यामुळे विविध आजार त्यांना बळावत हाेते. अशातच त्यांची प्रकृती बिघडली की मुली त्यांना आपल्या घरी नेऊन उपचार करायच्या किंवा वडिलांकडे राहुन शुश्रूषा करायच्या. फरी येथील मुलगी त्यांची देखभाल करीत असे.अंत्यसंस्कारासाठी ‘जंकासं’कडून मदत

बाबूराव मडावी हे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सभासद हाेते. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची हाेती. कुटुंबाला अंत्यविधीसाठी मदत व्हावी यासाठी संस्थेकडून आर्थिक मदत उपाध्यक्ष शेषराव कुमरे, संचालक धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे यांच्या हस्ते देण्यात आली.