ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भूमिगत रेल्वे पुलाचे औपचारिक लोकार्पण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शनिवारी दुपारी ४ वाजता करण्यात आले. शिलान्यासाचे अनावरण करून पुलाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी आमदार कृष्णा गजबे, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, जि.प. कृषी सभापती नाना नाकाडे, नगराध्यक्षा शालू दंडवते, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, हिरा मोटवानी, संतोष शामदासानी, ऋषी शेबे, अविनाश गेडाम यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.भूमिगत रेल्वे पुलाचे बांधकाम आठ महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पणाच्या औपचारिक कार्यक्रमाची प्रतीक्षा न करता सदर पूल रहदारीसाठी मोकळा करण्यात आला. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर शनिवारी या पुलाचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे आठ महिन्यानंतर पुलाचे लोकार्पण करण्यात येत असल्याचे खासदार अशोक नेते यांनी मान्य केले. याप्रसंगी देसाईगंज रेल्वेस्थानकाच्या विविध समस्या खासदारांसमोर मांडण्यात आल्या. सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन खासदारांनी दिले. रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी उडान पूल, वृध्द तसेच अपंगांसाठी रेल्वे गाडीत बसणे-उतरण्यासाठी व्हिल उपलब्ध करून देणे. दरभंगा-सिकंदराबाद रेल्वे थांबा देणे, रेल्वेच्या जागेत प्रसाधनगृह तयार करणे आदी समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी रेल्वेचे मंडळ रेल प्रबंधक ए. के. अग्रवाल, सिनियर मंडल वाणिज्य प्रबंधक अर्जुन सिब्बल, सिनियर विभागीय परिचालन प्रबंधक सचिन शर्मा, सिनियर डीइएन सत्यनारायण, वाणिज्य निरीक्षक सरदारे, वडसा स्टेशन मास्टर भोंडे, आरपीएफ बी. के. हरवंश, वरिष्ठ मंडल अभियंता सूर्यवंशी, मुख्य अभियंता निर्माण ए. के. पांडे, उपमुख्य अभियंता निर्माण एन. सी. पात्रा, मंडल सुरक्षा आयुक्त नागपुर आशुतोष पांडेय, रेल्वे उपनिरीक्षक बी. के. हरवंश उपस्थित होते.
रेल्वे पुलाचे औपचारिक लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:15 IST
आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भूमिगत रेल्वे पुलाचे औपचारिक लोकार्पण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शनिवारी दुपारी ४ वाजता करण्यात आले. शिलान्यासाचे अनावरण करून पुलाचे लोकार्पण करण्यात आले.
रेल्वे पुलाचे औपचारिक लोकार्पण
ठळक मुद्देदेसाईगंजात कार्यक्रम : आठ महिन्यांपूर्वीच रहदारीसाठी भूमिगत पूल झाला मोकळा