शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात अडकलेल्या मजुरांचा सरकारला विसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:58 IST

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्य वगळण्यात आले आहे. हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असताना त्यांचा विसर सरकारला कसा पडला? असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देविदर्भातील हजारो मजूर अडकले सहा राज्यांना पाठविलेल्या प्रस्तावात समावेश नाही

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे कामाच्या ठिकाणी अडकलेल्या मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्य वगळण्यात आले आहे. वास्तविकत: पूर्व विदर्भातील हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असताना त्यांचा विसर सरकारला कसा पडला? असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून आहेत. या चार जिल्ह्यांव्यतिरिक्त भंडारा, गोंदिया, लातूर या जिल्ह्यांमधील हजारो मजूर विविध कामांसाठी तेलंगणा राज्यात कामासाठी जातात. सरकारी आकडेवारीनुसार, एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १३ हजार १७७ मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत. तसेच तेलंगणा राज्यातीलही शेकडो मजूर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. तेलंगणा राज्यात मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मिरची तोडण्यासाठी जानेवारी महिन्यात गेले होते. घराकडे परतण्याच्या तयारीत असताना कोरोनामुळे केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे महिनाभरापासून सदर मजूर कामाच्या ठिकाणी अडकले आहेत. ते घराकडे येण्याची आस लावून आहेत. पण राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने त्यांना परत येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे राज्य शासनानेच त्यांना आणण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.दोन राज्यातील मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्याला वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने ही चूक तातडीने सुधारून तेलंगणातील मजुरांचा स्वगावी येण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. सध्या अनेक मजूर आडमार्गाने, पोलिसांची नजर चुकवत, शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस