शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ग्रामसभेला पट्टा दिलेले जंगल अतिक्रमणधारकांकडून भूईसपाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

शासनाने भामरागड ग्रामसभेला २०१४ मध्ये पर्लकोटा नदीच्या बाजूने पश्चिमेकडील ४८३ हेक्टरचा वनहक्क पट्टा दिला. त्यातील वनौपजातून ग्रामसभेला मिळकत येत आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून त्या जागेवर तालुक्यातील लोक अतिक्रमण करत आहेत.  वनविभाग किंवा कोणाकडूनही कारवाई होत नसल्यामुळे जुलै महिन्यात आणखी काही लोकांनी अतिक्रमण करून जेसीबीने झाडे पाडली.

ठळक मुद्देभामरागडमधील शेकडो झाडांची कत्तल, ग्रामसभेच्या तक्रारींकडे प्रशासनाची डोळेझाक

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड ग्रामसभेला पर्लकोटा नदीलगत देण्यात आलेल्या ४८३ हेक्टर सामूहिक वनपट्ट्यावर अनेक लोकांनी अतिक्रमण करून त्यावरील मौल्यवान झाडे भुईसपाट करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे वनविभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कारवाई न करता डोळेझाकपणा केला जात असल्याचा आरोप भामरागड ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. शासनाने भामरागड ग्रामसभेला २०१४ मध्ये पर्लकोटा नदीच्या बाजूने पश्चिमेकडील ४८३ हेक्टरचा वनहक्क पट्टा दिला. त्यातील वनौपजातून ग्रामसभेला मिळकत येत आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून त्या जागेवर तालुक्यातील लोक अतिक्रमण करत आहेत. वनविभाग किंवा कोणाकडूनही कारवाई होत नसल्यामुळे जुलै महिन्यात आणखी काही लोकांनी अतिक्रमण करून जेसीबीने झाडे पाडली.पत्रकार परिषदेला भामरागड ग्रामसभा आणि वनसमितीचे अध्यक्ष वामन उईके, सचिव भारती इष्टाम, आदिवासी सेवक सबरबेग मोगल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

स्थानिक नागरिक, महिलांना धमकीअतिक्रमण करणाऱ्यांना ग्रामसभेच्या वतीने काही गावकऱ्यांनी टोकले असता त्यांनाच जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. गावातील नागरिकांनी यासंदर्भात तहसीलदार आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली; पण कोणीच त्याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांना या अधिकाऱ्यांचे तर पाठबळ नाही ना? अशी शंका ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

...तर पट्टा करणार शासन जमा

वन कायद्याचे उल्लंघन करत अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे भामरागडवासीय त्रस्त झाले आहेत. अतिक्रमणधारकांनी हा पट्टा असाच गिळंकृत केल्यास तो ग्रामसभेच्या नावाने असण्यास काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे गावकरी मंडळी हा पट्टा शासनाला परत करून आंदोलनाला सुरुवात करू, अशी भूमिका ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अधिकारी उंटावरून हाकतात शेळ्याग्रामसभेला वनहक्काचा पट्टा दिला असला तरी त्या जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. असे असताना वनविभागाचे अधिकारी तक्रार करूनही कोणतीच कारवाई करायला तयार नाहीत. सर्व अधिकारी आलापल्ली, अहेरीत राहतात. तेथूनच कारभार पाहत असल्यामुळे आता कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल भामरागड ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भामरागड परिसरातील आदिवासींच्या अशिक्षीतपणाचा आणि भाेळ्याभाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेत अधिकारीही बनवाबनवी करत आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग