शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: February 8, 2017 02:32 IST

आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी तहसील कार्यालयाच्या मागील गडअहेरी, गिट्टी खदान व

दोन वर्षानंतर कारवाई : झोपड्या व पक्की घरे पाडली; गुन्हे दाखल अहेरी : आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी तहसील कार्यालयाच्या मागील गडअहेरी, गिट्टी खदान व प्राणहिता कॅम्प समोरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून काही नागरिकांनी झोपड्या उभारल्या होत्या. तर काहींनी पक्के घरेही बांधली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन जमिनीवरील कच्च्या स्वरूपाच्या झोपड्या काढल्या आहेत. वन विभागाने दोन वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या वन जमिनीवरील झोपड्या हटविल्या होत्या. मात्र पुन्हा काही दिवसातच त्याच ठिकाणी नागरिकांनी नव्याने झोपड्या उभ्या केल्या. झोपड्या उभारल्या जात असताना वन विभागाने बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच गेले. मंगळवारी अचानक अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. अचानक वन विभागाला कशी जाग आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही नागरिक वन जमिनीवर अतिक्रमण करून काही दिवसातच सदर झोपड्या दुसऱ्या व्यक्तीला विकत असल्याचेही दिसून येत आहे. वन विभागाने धर्मा पोचम सुरिला, वसंता मडावी, वनराज झाडे, अनिल झाडे, पोचन्ना कोटावार, सोनी मडावी, राजू गावडे, सूरज दहागावकर यांच्या झोपड्या हटवून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी प्रभाकर आत्राम, अतिक्रमण पथक अधिकारी एस. एस. आत्राम, वनपाल टी. चंद्रशेखर, जी. एल. नवघरे, मारखंडी मुत्तेवार, एल. एस. मडावी, सुरेश पुस्पनुरवार, वनरक्षक आर. एस. मडावी, प्रकाश नंदगिरवार, एस. एस. गुरनुले यांच्यासह पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली.