शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

क्षयमुक्तीसाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यत पाेहाेचावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साळुंखे, जिल्हा आराेग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे, डॉ.नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.प्रफुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. २४ मार्च राेजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १३ क्षयरोग पथकांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : क्षयरुग्णांचा शाेध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यंत पाेहाेचावे, त्यांचा शाेध घ्यावा, असे आवाहन, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल रूडे यांनी केले.  जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साळुंखे, जिल्हा आराेग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे, डॉ.नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.प्रफुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. २४ मार्च राेजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १३ क्षयरोग पथकांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.प्रास्ताविक डॉ.सचिन हेमके यांनी केले. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत या वर्षी घोषित करण्यात आलेल्या ‘टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा’ या घोषवाक्याचे महत्त्व पटवून दिले.  संचालन गणेश खडसे व आभार ज्ञानदीप गलबले यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अनिल चव्हान, राहुल रायपुरे, मनिष बोदेले, विनोद काळबांधे, विलास भैसारे, शरद गिऱ्हेपुंजे, प्रसन्नजीत कोटांगले, लता येवले, वंदना राऊत, लक्ष्मी नागेश्वर यांच्यासह जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

क्षयराेग दिनदर्शिकेचे लाेकार्पण -    जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृह गडचिरोली येथे आयोजित जिल्हास्तरीय आशा व गटप्रवर्तक पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान क्षयरोगावर मार्गदर्शन करून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते क्षयरोग दिनदर्शिका व इतर जनजागृती साहित्यांचे लोकार्पण करण्यात आले.

 

टॅग्स :Healthआरोग्य