लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील पेंदलकुही येथील सहा मजुरांनी ३५० किमीचा पायी प्रवास करीत आपले गाव गाठले.दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात काम करणारे शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. पेंदलकुही येथील सहा मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कामासाठी गेले होते. यामध्ये तीन महिला व तीन पुरूष मजुरांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने या मजुरांनी पायदळच गाव गाठण्याचा निर्णय घेतला.१९ एप्रिल रोजी ते राजुरावरून निघाले. मूल, ब्रह्मपुरी, कोरची मार्गे २४ एप्रिल रोजी गाव गाठले. पाच दिवसांच्या प्रवासामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुरखेडा, कोट्रा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रमेश नांदणे व परमेश्वर गायकवाड यांनी या मजुरांना थांबवून विश्रांती करण्याचा सल्ला दिला. मात्र उन्हातच या मजुरांनी स्वत:चे गाव गाठले.
पायी प्रवास करून गाठले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST
दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात काम करणारे शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. पेंदलकुही येथील सहा मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कामासाठी गेले होते. यामध्ये तीन महिला व तीन पुरूष मजुरांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने या मजुरांनी पायदळच गाव गाठण्याचा निर्णय घेतला.
पायी प्रवास करून गाठले गाव
ठळक मुद्देपेंदलकुही येथील मजूर : ३५० किमी पायदळ चालून पोहोचले गावी