शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:05 IST

आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता शिक्षकांसह प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, त्यांची आरोग्यविषयक सुरक्षितता यासह त्यांच्या अनेक समस्या सोडवून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले.

ठळक मुद्देइंदूराणी जाखड : इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तीन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता शिक्षकांसह प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, त्यांची आरोग्यविषयक सुरक्षितता यासह त्यांच्या अनेक समस्या सोडवून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका यांची प्रगती कार्यशाळा सोमवारपासून स्थानिक इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सुरू झाली. ही कार्यशाळा २२ मे पर्यंत राहणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार, अनिल सोमनकर, वंदना महल्ले उपस्थित होते. तीन दिवसीय प्रगती कार्यशाळेत पहिल्या दिवशी गटनिहाय चर्चा, आराखडा तयार करणे, सादरीकरण, धोकादायक बाबी, सभा समिती अंतर्गत आरोग्य विषयक बाबींवर चर्चा, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सर्पदंश होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना, सर्पदंश झाल्यास उपचाराविषयी सतर्कता तसेच इंग्रजी भाषेचा दैैनंदिन वापर, शैक्षणिक साहित्य निर्मिती याविषयी अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रगती कार्यशाळेला तिन्ही प्रकल्पातील मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका उपस्थित होत्या. संचालन सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी आसाराम शिवणकर, रवी लाडे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डब्लू. के. कोडापे, वसंत भिवगडे यांनी सहकार्य केले.दोन दिवस या विषयांवर होणार मार्गदर्शनएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिकांना प्रगती कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. २१ व २२ मे रोजी योग व प्राणायाम पीओसीएसओ कायदा आणि लैैंगिक शोषण इम्प्रुव्हींग लर्निंग आऊटकम्स, शैक्षणिक गुणवत्ता विकास, मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका यांच्या जबाबदाºया, ग्रंथालयाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व, नावीण्यपूर्ण शाळा व सहशालेय उपक्रम याविषयी तर शेवटच्या दिवशी स्काऊट-गाईड, शालेय शीस्त, श्रमदान, अ‍ॅक्टिव्हीटी बेस लर्निंग अँड डिजिटल स्कूल, निर्लेखन, व्यक्तिमत्त्व विकास व प्रोत्साहन या प्रमुख विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.