शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शेवटच्या दिवशी आरमोरीत नामांकनासाठी इच्छुकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:31 AM

आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची एकच झुंबड उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची एकच झुंबड उडाली. नामांकन दाखल करण्याच्या कालावधीत (दि.२ ते ९) नगराध्यक्षपदासाठी एकूण १० तर नगरसेवकपदासाठी १३९ नामांकन दाखल झाले आहेत.शेवटच्या दिवशी (दि.९) दुपारी ३ वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १०० उमेदवारांनी तहसील कार्यालयात नामांकन दाखल केले. त्यात विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचाही समावेश होता.दि.१० ला सर्व नामांकनांची छाननी होईल. त्यातून नामांकन वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी दि.१७ पर्यंत मुदत राहणार असून त्यानंतर दि.२७ ला मतदान होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षण बदलाबाबत न्यायालयाकडून दखल घेण्यात न आल्याने अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे.नगराध्यक्षपदासाठी यांचे नामांकनएसटी प्रवर्गासाठी राखीव नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पवन दिलीप नारनवरे, काँग्रेसकडून तेजेश श्रीराम मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद यादवराव सोनकुसरे, बहुजन समाज पार्टीकडून विनोद बळीराम वरठे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून कोमल गोविंदा ताडाम, शिवसेनेकडून आकाश रामकृष्ण मडावी आणि इतर अपक्षांंनी नामांकन दाखल केले आहे.न्यायालयीन याचिका खारिज?नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर आक्षेप घेणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका याचिकेवर दि.८ तर दुसरीवर दि.९ ला अंतिम सुनावणी होती. मात्र या याचिकांमधील दावा फेटाळून उच्च न्यायालयाने त्या याचिका खारिज केल्याची चर्चा शहरात सुरू होती. संबंधित याचिकाकर्त्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षElectionनिवडणूक