शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

आदिवासी दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 01:47 IST

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : गावातून काढली रॅली; मान्यवरांनी केले मार्गदर्शन; योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान आदिवासींच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मॉ दंतेश्वरी देवस्थान धानोरा - विश्व आदिवासी दिनानिमित्त मॉ दंतेश्वरी देवस्थान धानोरा येथे आदिवासी देवतांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन बावजी उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून गणूजी जंगी, अध्यक्ष माधव गोटा, चंदू किरंगे, सुखरंजन उसेंडी, परसराम पदा, नंदकिशोर नैताम, हालामी, रेखा हलामी, मनेश्वर करंगामी, मिलींद किरंगे, प्रशांत कोराम, विनोद करंगामी, गणेश कुळमेथे, शिवराम उसेंडी, उत्तम आतला, नीतेश वालको आदी नागरिक उपस्थित होते. कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय येथे जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांभुळे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून बोरकर, गोंडाणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात शहीद बिरसामुंडा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. विद्यार्थिनींनी गोंडीभाषेतील प्रार्थना गीत गायले. कार्यक्रमाला वालकर, उंदीरवाडे, वालदे, बडोले उपस्थित होते. संचालन गाडगे तर आभार फुंडे यांनी मानले. माता कन्यका देवस्थान अहेरी - आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन विभागीय शाखा व तालुका शाखा अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने माता कन्यका देवस्थान अहेरीच्या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार जी. टी. पुरके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीधर मसराम होते. प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, कार्यकारी अभियंता उसेंडी, नगर पंचायतीच्या उपाध्यक्षा अन्नपूर्णा सिडाम, फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष प्रा. रमेश हलामी, सत्कारमूर्ती नारायण कुंंभरे, नगरसेविका रेखा सडमेक, लक्ष्मी कुळमेथे, विलास सिडाम, बुधा नरोटे, प्रदीप शेडमाके, उदयचंद सडमेक, कोडापे आदी उपस्थित होते. सुरूवातीला अहेरी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार पुरके यांनी आदिवासी समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक बबलू सडमेक, संचालन महेश मडावी तर आभार अनंता आलाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी रंजन कोडापे, रमेश सिडाम, अजय आत्राम, श्यामराव सिडाम, श्यामा सिडाम, सुंदरदास सडमेक, नागोराव सडमेक, प्रदीप सडमेक, ऋषी होळी, बी. जी. सिडाम, किशोर वेलादी, विश्वनाथ वेलादी यांनी सहकार्य केले. सांस्कृतिक भवन मुलचेरा- येथे आदिवासी दिनानिमित्त कुपारलिंगो, बिरसामुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती नामदेव कुसनाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांची गोंडीनृत्य स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मुलचेराचे सुभाष आत्राम, पोलीस निरीक्षक संदीप हजारे, वन परिक्षेत्राधिकारी वसंत मेडेवार, बँकेचे व्यवस्थापक सिडाम, गटशिक्षणाधिकारी ए. जी. हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक वीरेंद्र खांडेकर, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष देवाजी चौधरी, लटारे, गणपत मडावी, कुसनाके, मडावी, दिलीप आत्राम, प्राचार्य लतीफ शेख, नगरसेविका चापले, नगरसेविका कुसनाके, पोलीस पाटील पेंदाम, दीपक परचाके, विकास मडावी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आदिवासींच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. भगवंतराव आश्रमशाळा, लगाम - मुलचेरा तालुक्यातील भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी अस्मिता दिनानिमित्त गावातून मुख्य मार्गाने रॅली काढली. रॅलीनंतर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश दुधबावरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक कौशी व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गोंडीनृत्य सादर केले. आदिवासी दिनाबद्दल भाषणे व गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रास्ताविक विलास आंबोरकर, संचालन सोनुजी निकुरे तर आभार जयपाल उकरे यांनी मानले. कोरची शहरातून रॅली - आदिवासी दिनानिमित्त कोरची शहरातून रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांच्या आगमनाच्यावेळी गोंडीनृत्य सादर केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एन. झेड. कुमरे, सतीश पेंदाम, दशरथ मडावी, शालिक मानकर, प्रभू राजगडकर, माजी जि. प. सदस्य आशा कुमरे, देवराव गजभिये, आनंद चौबे, कमलनारायण खंडेलवार, प्रतापसिंग गजभिये, मनोज अग्रवाल, हिरा राऊत, नगरसेवक हर्षलता भैसारे, शारदा नैताम, प्रियतमा जेंगठे, ज्योती नैताम, पद्माकर मानकर, नंदकिशोर वैरागडे, सियाराम हलामी, सुगंधा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आभार हेमंत मानकर यांनी मानले. आष्टी - श्री सद््गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मारगोनवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. रमेश सोनटक्के, डॉ. पंकज चव्हाण, डॉ. एम. सिंग, डॉ. पी. के. सिंग, डॉ. कश्यप, प्रा. पेदीवार, प्रा. रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक रासेयो विभाग प्रमुख प्रा. गोपाल तोमर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. रमेश सोनटक्के यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क) लोकराज्य आदिवासी विशेषांकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत विमोचन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या हस्ते आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासींविषयी माहिती असलेल्या लोकराज्य अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. आदिवासी विशेषांकात आदिवासीविषयक योजनांची माहिती देण्यात आली आहे. आदिवासी भागाचे प्रतिनिधीत्त्व करणारे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्फतीने आदिवासीबांधवांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयीचे मनोगत या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. लेखमालेत मायेचा ओलावा, नवी दिशा विकासाची, विकास आणि प्रगती, माझी पहिली पोस्टिंग, वाटा समृद्धीच्या, हक्काचे संरक्षण, कौशल्यातून रोजगाराकडे, शाश्वत विकासासाठी पेसा या लेखांचा समावेश आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी मांडणी केली आहे. सदर अंक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात तसेच बूक स्टॉलवर उपलब्ध आहेत.