शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात ४६ कोटीतून रस्ते, इतर बांधकामांवर खर्च

By admin | Updated: November 19, 2014 22:40 IST

प्रत्येक गावाला रस्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न करतांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचा विकास साधण्यात आला. या विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, चामोर्शी, धानोरा व मुलचेरा तालुक्यातील

गडचिरोली : प्रत्येक गावाला रस्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न करतांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचा विकास साधण्यात आला. या विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, चामोर्शी, धानोरा व मुलचेरा तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा विकास करण्यात आला. मागील पाच वर्षात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात रस्त्यासह इतर बांधकामावर ४६ कोटी ३४ लाख ३२ हजार ५१० रूपयांचा खर्च करण्यात आला. २०११-१२ मध्ये गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात रस्ता, रस्त्यावर स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे, खडीकरण, पांदन रस्ता आदी १४ कामे करण्यात आली. यावर १ कोटी ९३ लाख २४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. त्याबरोबरच एकात्मिक कृती आराखडा अंतर्गत चामोर्शी तालुक्यात ९ विकास कामांवर ६ कोटी ८२ लाख ८ हजार ५१० रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये मुरमुरी, अनंतपूर, हिवरगाव, कुदुरर्शी टोला, रेखेगाव, घोट, देवापूर आदी गावांमध्ये रस्त्याचे खडीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. गडचिरोली तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १२ विकास कामे करण्यात आली. या कामांवर १८ कोटी १५ लाख ३१ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. माडेमुल, इंदाळा, पारडी, गोगाव, नवरगाव, रानभूमी, मरेगाव, माडेतुकूम, दर्शनी चक, येवली, विश्रामपूर- उसेगाव, मौशीखांब, गिलगाव, आंबेशिवणी आदी गावांना रस्त्याने जोडून डांबरीकरण करण्यात आले. धानोरा तालुक्यात ६ कामांवर ८९ लाखांचा खर्च करण्यात आला. यात कुथेगाव- फुलबोडी, येरकड- गटानयेली, दराची- माळंदा, येरंडी, दुधमाळा, उशिरपार - कारवाफा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली. २०१२-१३ अंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३९ विकासकामे करण्यात आली. यामध्ये रस्त्याचे बांधकाम, दुरूस्ती, मोरी बांधकामांचा समावेश आहे. या कामांवर एकुण ५ कोटी ६० लाख ५३ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. या निधी अंतर्गत धानोरा, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील काही भागांमध्ये रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. त्याबरोबरच रस्त्याचे खडीकरण, रस्त्यावर मोरी बांधकाम, दुरूस्ती, रस्त्यांना संरक्षण भिंत उभारणे आदी १७ कामे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात करण्यात आली. या बांधकामांवर २ कोटी १८ लाख रूपयांचा निधी खर्च करून पेंढरी- रेचेगाव, चव्हेला- पेंढरी, मुरूमगाव- जप्पी, चिचोली- सालेभट्टी, चातगाव- टोला, मौशिखांब- मोहटोला, कातखेडा- मौशिचक, मुरमाडी, कुरखेडा- खुर्सा, नवेगाव- खुर्सा, सावरगाव- कुरखेडा आदी मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती, खडीकरण व डांबरीकरणाची डागडूजी करण्यात आली. या अंतर्गत १७ कामे करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)