लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्या पथकाने मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी वाहन जप्त केले. सदर कारवाई शनिवार अंबेला परिसरात केली.मुलचेरा ते अंबेला या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुरूम टाकले जात आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी अचानक भेट दिली असता, मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले. याबाबतची सूचना दिल्यानंतर नायब तहसीलदार आर. व्ही. तलांडे व तलाठी रामचंद्र कलगटवार, रूपेश झाडे, कोतवाल धम्मदीप खोब्रागडे यांच्या पथकाने कारवाई करून पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त केला. पकडलेला जेसीबी मुलचेरा पंचायत समितीची सदस्य बासू मुजूमदार व ट्रॅक्टर निखील हलदर, सपन मिस्त्री, निरंजन बैरागी, सपन मंडल, अविनाश कुलसंगे यांच्या मालकीच्या आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर जवळपास १ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर अवैध मुरूम टाकला जात असतानाही तहसीलदार व तलाठी यांचे दुर्लक्ष होत होते. विशेष म्हणजे, मुलचेरा तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नाही. याचा गैरफायदा रेती व मुरूम तस्कर उचलतात. सुटीच्या दिवशी तलाठी व इतर कर्मचारी येत नसल्याची पक्की माहिती तस्करांना राहत असल्याने सुटीच्या दिवशीच रेती व मुरूमाची चोरी केली जाते. सर्व तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी होत आहे. ज्या ठिकाणावरून मुरूम चोरले जात होते, त्या ठिकाणी जवळपास ५०० ब्रास मुरूमाची चोरी झाल्याचे दिसून येते. सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.कंत्राटदाराने अंबेला येथील सर्वे क्रमांक १९ मध्ये मुरूम खननाचा परवाना घेतला. मात्र प्रत्यक्षात सर्वे क्रमांक १४ मध्ये खनन सुरू होते.
मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST
मुलचेरा ते अंबेला या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुरूम टाकले जात आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी अचानक भेट दिली असता, मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले. याबाबतची सूचना दिल्यानंतर नायब तहसीलदार आर. व्ही. तलांडे व तलाठी रामचंद्र कलगटवार, रूपेश झाडे, कोतवाल धम्मदीप खोब्रागडे यांच्या पथकाने कारवाई करून पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त केला.
मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त
ठळक मुद्देएसडीओंची कारवाई । मुलचेरा ते अंबेला रस्त्याच्या कामासाठी वापर