शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील पाच हजार शेतकऱ्यांनी केले वीज बिल काेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

महाकृषी ऊर्जा धोरण २०२०  अंतर्गत कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर, वरोरा,  ब्रह्मपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या ४२ हजार ७९६ कृषिपंप ग्राहकांनी  ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तीच्या दिशेने पावले टाकली. तर २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखांचा भरणा करीत आपले वीज बिल कोरे करून घेतले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महावितरणने सुरू केलेल्या वीज बिल याेजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील जवळपास ५ हजार शेतकरीवीज बिल मुक्त झाले आहेत. त्यांनी ७ काेटी रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. महाकृषी ऊर्जा धोरण २०२०  अंतर्गत कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर, वरोरा,  ब्रह्मपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या ४२ हजार ७९६ कृषिपंप ग्राहकांनी  ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तीच्या दिशेने पावले टाकली. तर २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखांचा भरणा करीत आपले वीज बिल कोरे करून घेतले. 

मूलभूत सुविधांसाठी  ३० काेटी खर्चचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या ४४ कोटी ५० लाखांच्या वीज बिलाच्या रकमेतून ६६ टक्के म्हणजे एकूण २९ कोटी ३७ लाख रुपये कृषी ग्राहकांना  मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च हाेणार आहेत. यात प्रामुख्याने नवीन रोहित्रे बसविणे, नवीन वीजजोडण्या देणे, नवीन अतिरिक्त रोहित्रे बसविणे इत्यादी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार ३४६ कृषी ग्राहकांना वीजजोडण्या  देण्यात आल्या आहेत.

 चंद्रपूर व  गडचिरोली जिल्ह्यातील कृषिपंपधारक ग्राहकांना एकीकडे थकबाकीमुक्त होण्याची संधी, तर दुसरीकडे त्यांच्या जिल्ह्यांचा व गावांचा विकास साधला जाण्याचे महत्त्वाचे सत्कार्य घडणार आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वी  थकबाकी व वीज बिलामध्ये ५० टक्के माफी मिळविण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा. -सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी