शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
4
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
5
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
6
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
7
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
8
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
9
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
10
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
11
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
12
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
13
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
14
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
15
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
16
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
18
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
19
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
20
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

हत्ती आले पळापळा...! मध्यरात्री पाच कुटुंबे सैरावैरा; डोक्यावरचे छत गेले, पण जीव थोडक्यात वाचला 

By संजय तिपाले | Updated: December 25, 2023 18:36 IST

गोंदियाकडे वळलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा माघारी फिरला असून पाथरगोटा (ता.आरमोरी) येथे मध्यरात्रीनंतर २० ते २२ रानटी हत्ती पाच घरांवर चाल करुन आले.

गडचिरोली: मध्यरात्री भरझोपेत घरावर हत्ती आले. धडकेने घर हलले, भांडी कोसळली... हत्तींच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून पाच कुटुंबे जीवाच्या भीतीने घर- संसार सोडून मागच्या दारानेसैरौवैरा धावली. त्यामुळे जीव तर वाचला, पण या कुटुंबांवर उघड्यावर येण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढावला. आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे २४ डिसेंबरच्या रात्री हा थरार घडला.

गोंदियाकडे वळलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा माघारी फिरला असून पाथरगोटा (ता.आरमोरी) येथे मध्यरात्रीनंतर २० ते २२ रानटी हत्ती पाच घरांवर चाल करुन आले. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराच्या दरवाजाला ठोक दिली. हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळ काढला आणि मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले, पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर सह वनपरक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल मुखरु किनेकर ,वनरक्षक बाळू शिऊरकर , रुपा अत्करे , पंढरी तेलंग आदी दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले.घरांचे नुकसान झाले, पण जीवितहानी टळली. पाच कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था करावीदरम्यान, हत्तीच्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांसमोर जायचे कोठे, रहायचे कसे, खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.यापूर्वी शंकरनगर येथे ९ सप्टेंबर रोजी हत्ती पहिल्यांदा दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यांसह बोअरवेल, इलेक्ट्रिक साहित्यांचे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा या भागात हत्तींनी एन्ट्री केल्याने शेतकरी हादरले आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली