सरपंच, उपसरपंचाची माहिती : नळ पूर्ववत होतील सुरूआलापल्ली : येथील पाणी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन बुधवारी आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे व उपसरपंच पुष्पा अलोणे यांनी दिले आहे. ‘लोकमत’मध्ये आलापल्लीच्या पाणी टंचाई समस्येबाबत सातत्याने वृत्त येत असल्याने याचे गंभीर पडसाद बुधवारी उमटले. आलापल्ली येथे ग्रामपंचायत भवनात सरपंच रेणुका कुळमेथे व उपसरपंच पुष्पा अलोणे यांनी लोकमत प्रतिनिधीला पाच दिवसात आलापल्लीकरांची पाणी समस्या सोडवू, असे सांगितले. यावेळी प्रभारी ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी, सदस्य रवींद्र मुप्पीडवार, विनोद अकनपल्लीवार व अन्य सदस्य उपस्थित होते. जास्तीत जास्त थकबाकीची रक्कम भरून आम्ही पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पाच दिवसात हा प्रश्न निकाली निघेल, अशी माहितीही त्यांनी दिली. आलापल्लीकरांना पाण्याच्या या प्रश्नामुळे प्रचंड त्रास सध्या सहन करावा लागत आहे.
पाच दिवसात आलापल्लीचा पाणी प्रश्न सोडवू
By admin | Updated: March 31, 2016 01:41 IST