पिसेवडधातील घटना : २५ हजार रूपयांचे नुकसान मानापूर/देलनवाडी : येथून जवळच असलेल्या पिसेवडधा येथील दिनेश मुखरू मडावी यांच्या धानाच्या पुंजन्याला अज्ञात इसमाने बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. यामुळे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दिनेश मडावी यांनी दीड एकर जमिनीवर धान पिकाची लागवड केली होती. धान कापणीनंतर संपूर्ण धानाचे पुंजने शेतातच टाकले होते. अज्ञात इसमाने बुधवारी रात्री आग लावली. या आगीत संपूर्ण धान जळून खाक झाले. कर्ज घेऊन मडावी यांनी धानाची शेती केली होती. मात्र धान घरी आणण्याच्या बेतात असताना अज्ञात इसमाने आग लावली. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला शासनाने आकस्मिक मदत द्यावी, अशीही मागणी होत आहे. (वार्ताहर)
धानाच्या पुंजन्याला आग
By admin | Updated: December 23, 2016 00:57 IST