शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्हयातील अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:20 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली.

ठळक मुद्देभरती रुग्णांची धावपळ वायरिंगसह लाखोंचे महागडे साहित्य जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे ५० लाखांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य जळून खाक झाले.विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटने ही आग लागली. ५० खाटांच्या या रुग्णालयात जवळपास ७० रुग्ण भरती होते. टेलिमेडिसीन रुममधील विद्युत तारांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रांनी आणि टाकीतील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.रुग्ण भरती असलेल्या दोन्ही वॉर्डमध्ये ही आग पसरली नाही. मात्र अंतर्गत भागात सर्वत्र धूर पसरल्याने भरती असलेल्या रुग्णांची तारांबळ उडाली. त्यांना दुसऱ्या एका वॉर्डमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. या आगीत विद्युत पुरवठ्याची वायरिंग जळाल्यामुळे रूग्णालयाचा विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसह शस्त्रक्रिया ठप्प राहण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी अहेरी नगर पंचायतची अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली. सात महिन्यांपूर्वीच नगर पंचायतला ८५ लाख रुपयांच्या खर्चातून अग्निशमन वाहन देण्यात आले. मात्र प्रशिक्षित कर्मचारीच नसल्यामुळे हे अग्निशमन वाहन शोभेचे ठरले. ही आग विझविण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होऊ न शकल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.रुग्णालयाची वायरिंग खूप जुनी आहे. मशिनरी आधुनिक लागल्या असल्यामुळे त्याअनुषंगाने वायरिंगमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. वायरिंग दुरूस्तीसाठी यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निधीची मागणी केली आहे. मात्र निधी मिळाला नसल्यामुळे दुरूस्ती होऊ शकली नाही.- डॉ.कन्ना मडावी, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

टॅग्स :fireआग