शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आगीमुळे वीज यंत्रणेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:44 IST

वीज वाहिण्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठा होतो खंडीत : उपकरणांजवळ आग न लावण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वीज वाहिण्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज वाहिण्या, फिडर पीलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डीपी अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या वीज यंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पयार्याने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. सध्या तापमानातही वाढ झाली असल्याने कचऱ्यास आग लागण्याचे प्रकारही वाढत आहेत.वीज यंत्रणा उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीजवितरण यंत्रणेजवळचे तापमान आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फटका बसतो. वीज वाहिण्याखाली असलेल्या कचºयाचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये.अशा प्रकारच्या घटना घडून वीज ग्राहकांना विनाकारण त्रास होऊ नये यासाठी महावितरणने सहकार्य करण्याची विनंती नागरिकांना केली आहे. वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ७८७५७६११९५ या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे.वीज तारा वितळण्याचा धोकावाढलेल्या तापमानामुळे अगोदरच वीज तारांचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले राहते. अशातच आग लावल्यास आणखी वीज तारेचे तापमान वाढून वीज पुरवठा खंडीत होतो. रोहित्रापर्यंत आग पोहोचल्यास रोहित्र जळण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :electricityवीज