शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राजन्नापल्ली येथे घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:56 IST

गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील आरडा ग्रामपंचायतीअंतर्गत राजन्नापल्ली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत घरमालक चिलमुला यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसाहित्य जळून खाक : गॅस सिलिंडर लिकेजने घडली घटना

लोकमत न्यूज नेवटर्कसिरोंचा : गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील आरडा ग्रामपंचायतीअंतर्गत राजन्नापल्ली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत घरमालक चिलमुला यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.सिरोंचापासून १० किमी अंतरावरावरील राजन्नापल्ली येथील शंकर चिलमुला यांच्या घरी सोमवारी सकाळी स्वयंपाक केल्यानंतर गॅस बंद करण्यात आला नाही. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वयंपाकासाठी पुन्हा गॅस सुरू केला असता, गॅस लिकेज होऊन आग लागली. काहीवेळातच आगीने संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. घरातील सर्व कुटुंबीयांनी कसेबसे बाहेर पडून आरडाओरड केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी आग विझविण्यासाठी सदर घराकडे धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यात यश आले नाही. परिणामी चिलमुला यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. पाणी टँकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विझविण्यात आली. मात्र घरातील दागिणे, कपडे, भांडे व इतर साहित्य जळून खाक झाले. आरडाचे सरपंच बापू रंगुवार यांनी चिलमुला कुटुंबाला किराणा साहित्य दिले तसेच आर्थिक मदतही केली.शॉर्ट सर्किटने ग्रामीण रुग्णालयास आगस्थानिक ग्रामीण रुग्णालयातील औषधसाठा खोलीत शॉर्ट सर्किटने अचानक आग लागल्याने रुग्णालय इमारतीचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किने आग लागून धूर निघत असल्याचे लक्षात येताच रुग्णालयात कार्यरत परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत दाखल रुग्णांना सुरक्षितरित्या दवाखान्याच्या बाहेर काढले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.धकाते यांना भ्रमणध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश जाधव व पोलीस कर्मचाºयांनी रुग्णालयातील आग विझविण्यासाठी मदत केली. डॉ.धकाते यांनी नगर पंचायतीला संपर्क करून अग्निशामक वाहन पाठविण्यास सांगितले. मात्र येथील अग्निशमन वाहन नादुरूस्त असल्याने त्याची सेवा वेळेवर मिळू शकली नाही. या प्रकाराने येथील अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयी अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

टॅग्स :fireआग