शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

आगीत रोपवन जळून नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:08 IST

वैरागड परिसरातील सुकाळा येथील वनविभागाच्या रोपवनाला आग लागल्याने हे रोपवन जळून नष्ट झाले. या घटनेमुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देउपग्रहावरून घेतात माहिती : सीमावादात अडकले वनाधिकारी व कर्मचारी

ऑनलाईन लोकमतवैरागड : वैरागड परिसरातील सुकाळा येथील वनविभागाच्या रोपवनाला आग लागल्याने हे रोपवन जळून नष्ट झाले. या घटनेमुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र जंगलातील वनवे रोखण्यासाठी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. सीमावादात वनाधिकारी व कर्मचारी अडकल्याचे दिसून येत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात वनक्षेत्रास आग लागणे ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र यानंतरही जिल्ह्याच्या अनेक भागातील उभे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. अशा परिस्थितीत वनवे लागलेला जंगल आपल्या वनक्षेत्रात येत नाही, अशी बतावणी करून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत आहेत.जिल्ह्यातील वनक्षेत्रात लागणारे वनव्याचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मात्र वनव्याच्या नियंत्रणासाठी अधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. आरमोरी वनपरिक्षेत्रातील रामाळा बिटात चार वर्षांपूर्वी लावलेले रोपवन दिवसाढवळ्या जळून खाक झाले. लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. मात्र वनव्यावर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला यश आले नाही. वडसा वनविभागातील आरमोरी, कुरखेडा, देलनवाडी, पुराडा, पोर्ला आदी वनपरिक्षेत्रातील बरेचसे जंगल जळून खाक झाले. मात्र वनाधिकारी सुस्त आहेत.वनव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायरलाईनचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पण या फायरलाईनचा वनवे नियंत्रणासाठी काहीच उपयोग झाला नाही. वनाधिकारी मार्च समाप्तीचे बिल काढण्यात व्यस्त आहेत.