शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:38 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे ५० लााखांपेक्षा अधिक किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.

ठळक मुद्देभरती रुग्णांची धावपळ : वायरिंगसह लाखोंचे साहित्य जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी आग लागली. यात जीवित हानी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे ५० लााखांपेक्षा अधिक किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटने ही आग लागली. ५० खाटांच्या या रुग्णालयात सुमारे ७० रुग्ण भरती होते. टेलिमेडिसीन रुममधील विद्युत तारांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच विद्युत पुरवठा खंडित केला. रुग्णालयातील अग्निशमन यंत्र आणि टाकीतील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.रुग्ण भरती असलेल्या दोन्ही वॉर्डात ही आग पसरली नाही. मात्र आतील भागात सर्वत्र धूर पसरल्याने भरती रुग्णांची तारांबळ उडाली. आगीत विद्युत पुरवठ्याची वायरिंग जळाल्यामुळे रूग्णालयाचा विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसह शस्त्रक्रिया ठप्प राहण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी अहेरी नगर पंचायतची अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली. सात महिन्यांपूर्वीच नगर पंचायतला ८५ लाख रुपये खर्चून अग्निशमन वाहन देण्यात आले. मात्र प्रशिक्षित कर्मचारीच नसल्यामुळे हे वाहन शोभेचे ठरले. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.रुग्णालयाची वायरिंग खूप जुनी आहे. मशिनरी आधुनिक लागल्या. त्यासाठी वायरिंग बदलणे गरजेचे आहे. वायरिंग दुरूस्तीसाठी यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निधी मागितला. मात्र मिळाला नसल्यामुळे दुरूस्ती होऊ शकली नाही.- डॉ.कन्ना मडावी, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटल