शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील अहेरीत लागलेल्या आगीत २५ एकर तुरीचे शेत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 15:11 IST

येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या तुरीच्या पिकांना शनिवारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर मधील तुरीचे पीक जळून खाक झाले.

ठळक मुद्देलाखो रु पयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:- येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या तुरीच्या पिकांना शनिवारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर मधील तुरीचे पीक जळून खाक झाले.सविस्तर वृत्त असे की शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीचे महागाव लगत २५ एकर शेत असून या शेतात त्यांनी तुरीचे पीक घेतले होते. यात १२ एकरातील पीक घेऊन ते एका ठिकाणी साठवून ठेवले होते. तसेच उर्वरित १२ एकरात तुरीचे पीक लावून होते. मात्र शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान शेतातील एका कोपर्यातून आगीचे धूर निघताना दिसले. ही बाब समजताच शंकर गोंगले व तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष संजय अलोने यांनी शेताकडे धाव घेतली. संजय अलोने यांनी त्वरित अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी डॉ कुलभूषण रामटके यांना याची माहिती दिली. लगेच अहेरी नगर पंचायतचे अग्नीशामक वाहन निघाले मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले व संपूर्ण पीक यात जळून खाक झाले. यात शंकर गोंगले यांचे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले. तलाठी राजेंद्र आव्हाड यांनी पंचनामा केला.ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणी मुद्दाम लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे.

टॅग्स :fireआग