शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास बसणार पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतानाही वाहन चालविल्यास संबंधितावर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. परवाना नसताना दुसऱ्याचे वाहन चालवित असल्यास चालक व मालकावर प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. पूर्वी हा दंड केवळ ५०० रुपये हाेता. वाढत्या वाहनांच्या संख्येबराेबरच अपघातांची संख्या वाढली आहे.  बहुतांश अपघात वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे घडतात.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : १२ डिसेंबर २०२१ पासून शासनाने वाहतुकीबाबतचे सुधारित दंड जाहीर केले आहेत. यामध्ये   वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतानाही वाहन चालविल्यास संबंधितावर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. परवाना नसताना दुसऱ्याचे वाहन चालवित असल्यास चालक व मालकावर प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाणार आहे. पूर्वी हा दंड केवळ ५०० रुपये हाेता. वाढत्या वाहनांच्या संख्येबराेबरच अपघातांची संख्या वाढली आहे.  बहुतांश अपघात वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे घडतात. दर दिवशी शेकडाे नागरिकांचा अपघातामध्ये जीव जातो. दंडाची रक्कम अतिशय कमी असल्याने वाहतूक पाेलिसांना वाहनधारक जुमानत नव्हते. वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात हाेते. वाहतुकीचे नियम ताेडणाऱ्यांना जरब बसावा, या उद्देशाने केंद्र शासनाने दंडाचे सुधारित दर जाहीर केले आहेत. काही दंडांमध्ये दहापटपर्यंत वाढ केली आहे. नवीन दंडांमुळे नागरिक वाहतुकीचे नियम पाळतील, अशी अपेक्षा आहे. 

माेबाईलवर बाेलत वाहन चालविल्यास जावे लागेल थेट न्यायालयात -    पूर्वी माेबाईलवर बाेलताना आढळून आल्यास केवळ २०० रुपयांचा दंड ठाेठावला जात हाेता. आता मात्र संबंधिताता थेट न्यायालयातच पाठविले जाणार आहे. त्याला न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतील. न्यायालय जी शिक्षा देईल ती भाेगावी लागणार आहे. माेबाईलवर बाेलताना वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात घडतात. यावर आळा बसण्याची गरज आहे.

प्रति प्रवासी १००० रू.दंड-    एखाद्या चारचाकी वाहनाच्या क्षमतेच्या अधिकचे प्रवासी भरल्यास प्रति प्रवासी एक हजार रुपये दंड ठाेठावला जाणार आहे. पाच प्रवासी अधिकचे असतील तर पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला जाईल. -    काही काळीपिवळी चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. कधीकधी चालकाला बसायला जागा राहत नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस