शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा मुहूर्त सापडेना!

By admin | Updated: November 6, 2014 01:34 IST

नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा म्हणून वैरागड येथे ३० वर्षांपूर्वी ७५ हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.

वैरागड : नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करता यावा म्हणून वैरागड येथे ३० वर्षांपूर्वी ७५ हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु सदर पाणी पुरवठा योजना गावाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार निकामी ठरली आहे. या अनुषंगानेच १ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. नवीन पाणी पुरवठा योजनेचा आराखडाही तयार करण्यात आला. परंतु सदर योजनेच्या आर्थिक मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गडचिरोली, उपविभागीय अधिकारी कार्यकारी अभियंता कुरखेडा यांच्याकडे अडकुन आहे. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. वैरागड येथे जुन्याच पाणी पुरवठा योजनेंंतर्गत गावात पाणी पुरवठा सध्य:स्थितीत सुरू आहे. ग्रामपंचायत मार्फत दरवर्षी पाणी पुरवठ्यासाठी हजारो रूपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु भर पावसाळ्यात अर्ध्याअधिक नळधारकांना पिण्यापुरताही पाण्याचा पुरवठा होत नाही. गावातील पाईप लाईनला समान पाणी पुरवठा होण्यासाठी योग्य ठिकाणी व्हॉल्व नसल्यामुळे सखल भागातील नळधारक कुटुंबांना पाण्याचा अधिक पुरवठा होत नाही. उंच भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बारमाही भटकंती करावी लागते. दरवर्षी पाण्याची निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी जि. प. सदस्य व बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे ठरविण्यात आले. नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित न करता भोयर यांच्या घराजवळ ग्रा. प. च्या जागेवर केवळ पाण्याची टाकी तयार करण्यात आली. वाढते नळधारक व समस्या लक्षात घेऊन वैरागड येथे गोरजाई डोहाजवळ नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. (वार्ताहर)